आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:रिक्षेत बसवून तिघांनी प्रवाशाचा मोबाइल लांबवला; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेडी ते अजिंठा चौफुली या अवघ्या दोन किलोमीटर अंतरात एका रिक्षेत बसलेल्या तीन प्रवाशांनी सहप्रवाशांचा १० हजार रुपयांचा मोबाइल लांबवला. ही घटना ७ जून रोजी सकाळी १० वाजता घडली. तर ८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या रिक्षेत चालक, मालकाचे नाव व नंबर असलेले स्टिकर चिकटवलेले नसल्यामुळे लूट झालेल्या प्रवाशाला रिक्षेचा नंबरही लिहून ठेवता आला नाही. हेमंत शंकरराव काळुंखे (वय ६७, रा. खेडी) यांची लुट झाली आहे. काळुंखे हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ७ रोजी सकाळी ते खेडी येथून एका रिक्षेत बसले. यावेळी रिक्षेत तीन तरुण आधीच बसलेले होते. सुरूवातीला काळुंखे कॉर्नरला बसले होते. काही अंतर पुढे आल्यानंतर तीन तरुणांनी धावत्या रिक्षेत मस्करी करायला सुरूवात केली. हिन्दी भाषेत तिघे एकमेकांशी बोलत होते. याच मस्करीत त्यांनी नंतर काळुंखे यांना मध्यभागी बसायला सांगितले. याच दरम्यान, तिघांनी त्यांच्या शर्टच्या खिश्यातील मोबाइल काढून घेतला. रिक्षेतून उतरुन अजिंठा चौफुलीच्या पुढे आल्यानंतर काळुंखे यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी शोध घेतला परंतु चोरटे मिळून आले नाही. त्यानंतर काळुंखे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र राजपूत तपास करीत आहे.

जळगावातील तब्बल ९० % रिक्षांमध्ये स्टिकरच नाही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलिस दलाने एक चांगला उपक्रम सुरू केला होता. यात प्रत्येक रिक्षेत रिक्षाचालक, मालकाचे नाव, मोबाइलनंबर, रिक्षेचा नंबर लिहीलेले स्टिकर चिकटवले होते. त्यामुळे प्रवासी रिक्षेत बसताच संबधित स्टिकरवरुन माहिती घेत होते. पोलिसांनी हा उपक्रम सुरू करुन लागलीच बंद केला. ज्या रिक्षांमध्ये स्टिकर लावलेले होते त्यातील ९० टक्के चालकांनी स्टिकर काढून टाकलेले आहेत. ‘दिव्य मराठी’ने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली होती. काळुंखे यांनी ज्या रिक्षेतून प्रवास केला तिलाही स्टिकर चिकटवलेले नव्हते. अन्यथा त्यांनी नंबर लिहून ठेवला असता. त्यामुळे चोरट्यांना शोधणे सोपे झाले असते.

बातम्या आणखी आहेत...