आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Six Lakhs Not Spent On Pipes, Now Bifurcations For Street Lights; Divider Built Four Months Ago, Sitting Bhurdand Worth 10 Lakhs| Marathi News

पश्चातबुद्धी:पाइपांसाठी सहा लाख खर्च केले नाही, आता पथदिव्यांसाठी दुभाजक ताेडताहेत; चार महिन्यांपूर्वी बांधले दुभाजक, १० लाखांचा बसतोय भुर्दंड

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार महिन्यांपूर्वीच काम पूर्ण झालेल्या शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजक महापालिकेकडून पथदिवे लावण्यासाठी खाेदले जात आहे. दुभाजक बांधतानाच मनपाने केबलसाठी पाइप टाकला असता तर नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी थांबली असती. विशेष म्हणजे या कामासाठी वर्षभरापासून तीन काेटींचा निधी पडून हाेता; परंतु पालिकेने पाइपसाठी सहा लाख रुपये खर्च केले नाहीत. त्यामुळे आता दुरुस्तीवर १० लाखांपेक्षा अधिकचा भुर्दंड पडणार आहे. महानगरपालिकेला आॅगस्ट २०२१मध्येच जिल्हा नियाेजन समितीकडून महामार्गावर पथदिवे लावण्यासाठी तीन काेटी रुपये मिळाले आहेत. गेल्या वर्षभरापासून निविदांचा घाेळ सुरू असताना त्याचवेळी शहरातील महामार्गाचे काम सुरू हाेते. चार महिन्यांपूर्वीच महामार्गावर दुभाजक बांधून त्यावर हिरव्या रंगाचे ‘लाइट कटर’ बसवण्यात आले आहे. त्यावेळी दुभाजकांत महापालिकेने केबलसाठी नियाेजन आणि समन्वयाचा अभाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका या दाेन्ही यंत्रणांत समन्वय असता तर ही वेळ आली नसती. नियाेजन चुकल्याने वेळ, निधीचा अपव्यय झाला असून, महामार्गाचे विद्रूपीकरण झाले आहे, असे शासकीय कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी अभियंता अभिषेक काैल यांनी सांगितले.

लाइट लागण्यास उशीर
मार्च महिन्यात प‌थदिवे बसवण्याची वर्कआॅर्डर देण्यात आली आहे; परंतु दुभाजक काँक्रीटचे असल्याने ते मशीनच्या सहाय्याने फाेडून काढावे लागत आहे. त्याला उशीर हाेत असल्याने पथदिवे बसवण्यासाठी आता दसरा-दिवाळीतच उजाडेल.

एजन्सी निश्चित नसल्याने अडचण येत होती
निधी उपलब्ध हाेता; परंतु काम करणारी एजन्सी निश्चित नव्हती. मार्च महिन्यात कार्यारंभ आदेश दिले. दुरुस्ती याच एजन्सीकडून हाेईल. एस. एस. पाटील, विद्युत विभागप्रमुख, मनपा

केबल टाकण्यासाठी काेरलेला दुभाजक
४०५ पथदिवे लावणार : महामार्गावर तीन माेठे हायमास्ट, १४ छाेटे हायमास्ट आणि ३८८ प‌थदिवे लागतील. त्यासाठी १७ ठिकाणी वीज कनेक्शन घेतले जाईल.एका दिवसाला ७१५ युनिट वीज वापर हाेईल.

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट दुरुस्तीच्या अटीवरच दिली आहे परवानगी
पथदिवे लावण्यासाठी दुभाजक खाेदल्यानंतर पूर्ववत दुरुस्ती करून द्यावी या अटीवर महापालिकेला खाेदण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्याकडून ते केले जाईल. सी.एम. सिन्हा, प्रकल्प संचालक

१० लाखांचा येईल आता खर्च
खाेटेनगर ते कालिंकामाता मंदिरापर्यंत दुभाजक फाेडले आहेत. त्यावरील हिरवे लाइट कटरही तुटले आहेत. कंत्राटदाराला पाइपासह खाेदकामासाठी ११९ रुपये मीटरप्रमाणे पैसे दिले जाणार आहेत. पाइपसाठी ६.७५ लाख रुपये खर्च येणार असून, खाेदकामासाठी २ .१७ लाख खर्च अपेक्षित आहे; परंतु दुभाजक पूर्ववत करून देण्यासाठी निविदेत निधी नाही. हा खर्च नव्याने करावा लागणार आहे. दुभाजकाची स्थिती पाहता बांधकाम तज्ज्ञांच्या मते १० लाखांपेक्षा अधिक खर्च येईल

बातम्या आणखी आहेत...