आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दळणवळणावर परिणाम:धुके अन‌् थंडीमुळे सहा रेल्वेगाड्यांना विलंब

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर भारतात वाढलेले धुके आणि थंडीमुळे रेल्वे गाड्यांच्या दळणवळणावर परिणाम झाला आहे. यामुळे उत्तर भारतातून येणाऱ्या ६ आणि हावडा येथे रेल्वेने घेतलेल्या ब्लॉकमुळे त्या भागातून येणाऱ्या ५ गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावत आहे. उत्तर भारतात कडाक्याची थंडी व दाट धुके पडले आहे. धुक्यामुळे गाड्या कमी वेगात चालवल्या जातात. यामुळे भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या विलंबाने धावत आहे.

गुरूवारी उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्यांमध्ये पुष्पक एक्स्प्रेस ३ तास, कनार्टक ४, पवन २, पठाणकाेट ५, पंजाब मेल २, गुवाहाटी एक्स्प्रेस २ विलंबाने धावली. तर हावडा विभागात घेतलेल्या ब्लॉकमुळे गीतांजली एक्स्प्रेस २ तास, आझादहिंद एक्स्प्रेस ४, पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेस २, हावडा-अमदाबाद एक्स्प्रेस ४, हावडा मेल ४ तास विलंबाने धावली. यामुळे शेकडो प्रवाशांच्या प्रवासाचा खोळंबा झाला. आगामी आठवडा थंडी व धुक्याचा राहणार असल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढतील.

बातम्या आणखी आहेत...