आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावकारी कर्जाच्या ताणातून शेतकऱ्याची आत्महत्या:फवारणीचे द्रावण पिऊन संपवले जीवन, सोयगाव तालुक्यातील जरंडीतील घटना

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जरंडी (ता. सोयगाव) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने साडेतीन लाखांच्या सावकारी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. दीपक जनार्दन सुस्ते (वय 32) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

जरंडीत दीपक सुस्ते पत्नी स्वाती, मुलगी प्रांजल (8), मुलगा पीयूष (वय अडीच वर्षे) यांच्यासह राहत होते. दीपक यांच्या वाट्याला दीड एकर शेती आली होती. मोसंबी आणि कापसाचा पेरा केला. मात्र, बेभरवशी पावसामुळे पीक येऊ शकले नाही.

शेती व त्यासंबंधीत गोष्टींसाठी तसेच विविध कारणांसाठी दीपक सुस्ते यांनी खासगी सावकाराकडून वेळोवेळी घेतलेले कर्ज साडेतीन लाख रुपये झाले होते. स्वतःची शेती पिकवत ते इतरांच्या शेतीत मजुरी करीत होते. पण सावकाराचा पैशांसाठी तगादा लावला होता.

शेतजमीन सावकाराच्या घशात जाण्याची शक्यता पाहून ताणात असलेल्या दीपक सुस्ते यांनी गुरुवारी (ता. 1) दुपारी तीनच्या सुमारास फवारणी करताना, दीपक फवारणीचे द्रावण पिले. त्यानंतर ते अत्यवस्थ झाले.

ही बाब लक्षात येताच शेतातील इतर शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्यांना जिल्‍हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले पण उपचारादरम्यान दीपक यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...