आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविवेकानंदनगर, स्नेहल कॉलनी परिसरात रस्ते तयार करण्यासह गटारीवरील ढापे, निमुळत्या गटारी अरुंद आहेत. या गटारींवरील ढापे जमिनीलगत असल्याने व या ढाप्यांखालून बीएसएनएलच्या केबल गेलेल्या असल्याने येथे गाळ साठून पाणी वाहतुकीस अडथळा येतो. विवेकानंदनगरात तर नाल्यावर उंच पूल नसल्याने स्नेहल कॉलनी व विवेकानंदनगरसह परिसरातील अनेक खोलगट भागात पावसाळ्यात पाणी तुंबून या परिसराचा संपर्क तुटतो.
विवेकानंदनगर, स्नेहल कॉलनीचा परिसर खोलगट आहे. परिसरात नाल्यांद्वारे १० ते १५ कॉलनी परिसरातून पाणी वाहून येते. गटारी खोल असल्या तरी काही भागात त्या खूप निमुळत्या झाल्या आहेत. या गटारी ठिकठिकाणी तुटल्याने अनेक भागात त्यांना वनस्पतींनी वेढले आहे. तर विवेकानंदनगरात नाल्यावरील पूल जमिनीलगत असल्याने पावसाळ्यात येथील अनेक भागात पाणी तुंबून हा परिसर जलमय होतो. पावसाळ्यात गटारींचे पाणी जमिनीलगतच्या घरांत शिरते.
गटारींच्या खाली केबल
या परिसरात गटारींची नियमित साफसफाई केली जात नाही. तरी गटारींची नियमित साफसफाई करण्यात यावी. या गटारींमधील बीएसएनएलच्या केबल काढून या परिसरातील सर्वच ढापे उंच करण्याची गरज आहे. हे ढापे उंच नसल्याने १५ कॉलन्यांच्या परिसरातील वाहून येणाऱ्या पाण्याला अडथळा होतो.
- रवी अत्तरदे, स्नेहल कॉलनी
नाल्यावरील पूल उंच करावा
विवेकानंदनगरातील नाल्यावरील पूल जमिनीपासून खोल गेलेला असल्याने थोडाही पाऊस झाला तरी येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबते. त्यामुळे नाल्यावरील पूल जमिनीपासून उंच करण्याची गरज आहे. पुलाला कठडेही नाही. त्यामुळे थाेडासा जरी पाऊस पडला तरी येथून रहदारी बंद होते.
- रामेश्वर मुठे, विवेकानंदनगर
निमुळत्या गटारीमुळे घरात शिरते पावसाचे पाणी
स्नेहल कॉलनीचा परिसर खोलगट भागात वसलेला आहे. पावसाळ्यात गटारी निमुळत्या असल्याने हे पाणी रस्त्यांवर येते. कच्चे रस्ते, निमुळत्या गटारींमुळे पावसाळ्यात या परिसरातील जनसंपर्क तुटतो. स्नेहल कॉलनीतल नाल्यावरील पुलावर नवीन कठडे उभारायला हवे.
- सुनीता अत्तरदे, स्नेहल कॉलनी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.