आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहसंमेलन:नवीन माध्यमिक विद्यालयात स्नेहसंमेलन;‎ सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीचे दर्शन‎

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ नवीन माध्यमिक विद्यालयात‎ सांस्कृतिक कार्यक्रमातून‎ विद्यार्थ्यांनी देशभक्तीचे दर्शन‎ घडवले. वारकरी नृत्य, शिवाजी‎ महाराजांचा पोवाडा, राजस्थानी‎ नृत्य, देशभक्तीपर गीतगायन,‎ नाटिका, एकपात्री अभिनय,‎ बातमीपत्र, विनाेद व वैयक्तिक‎ नृत्य या कलाप्रकारांत विद्यार्थ्यांनी‎ कार्यक्रम सादर केला.‎ महिला पालकांनी व त्यांच्या‎ मुलांनी ‘एकटी एकही घाबरलीस‎ ना'' या गीतावर नृत्य सादर केले.‎

उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल मुस्कान‎ तडवी, प्रसाद यादव, लोकेश‎ ओतारी या आदर्श विद्यार्थ्यांना‎ सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात‎ आले. आदर्श विद्यार्थी यश‎ खैरनार, आदर्श पालक रंजना‎ खैरनार व आदर्श शिक्षक राजेंद्र‎ पवार यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह,‎ पुस्तक देऊन गौरवण्यात आले.‎ सुवर्णा सोनार, अश्विनी वाघुळदे‎ यांनी नियोजन केले. अध्यक्ष प्रा.‎ डाॅ. युवराज वाणी, उपाध्यक्ष वसंत‎ चौधरी, सचिव गोवर्धन पाटील,‎ मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी,‎ नीलेश नाईक आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...