आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्याही समस्या ऐका कोणी:प्राथमिक गरजांची तरी पूर्तता करा; विनोबानगर-सप्तशृंगी कॉलनीत गटारी, रस्ते, पथदिव्यांची समस्या

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विनोबानगर, सप्तशृंगी कॉलनीसह प्रभागातील अनेक नगर-कॉलन्यांमध्ये रस्ते, गटारी, पथदिवे आदी प्राथमिक गरजांसाठी नागरिक झगडत आहेत. अनेक वर्षांपासून या परिसरातील रस्ते, गटारी तयार न झाल्याने नागरिक आमच्याही समस्या कोणी ऐका, असे म्हणत आहेत.

या परिसरात रस्ते-गटारींप्रमाणेच पथदिव्यांच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात आल्या. त्यामुळे नगरसेवकांसह पालिका प्रशासनाने प्राथमिक गरजांची पूर्तता करावी अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आली.

रस्त्यांवर चिखल

प्रभाग क्रमांक 14 मधील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. थोडाही पाऊस झाल्यास रस्त्यांवरील खड्डे पाण्याने भरतात. तसेच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल पसरतो. अनेक भागात रस्त्यांप्रमाणेच गटारी करण्याची गरज आहे.

प्राथमिक गरजांची पूर्तता करा

जेथे गटारी झाल्या तेथे देखील गटारींच्या लेव्हलची समस्या असल्याने या गटारी गाळाने व पाण्याने भरल्या आहेत. त्यामुळे नगरसेवक व पालिका प्रशासनाने समन्वय ठेवून या परिसरात प्राथमिक गरजांची पूर्तता करावी. हा परिसर अतिशय दाटीवाटीने वसलेला असल्याने पालिका प्रशासनाने सोयीसुविधा कराव्यात असे नागरिकांचे म्हणणे आहे.

गटारींची नियमित सफाई व्हावी

या परिसरात रस्ते तर नाहीतच मात्र रस्त्यांबरोबर गटारी करण्याची गरज आहे. ज्या भागात गटारी आहेत त्या गटारींची नियमित साफ-सफाईची करणे गरजे आहे. येथील अनेक परिसरात गटारी गाळाने भरलेल्या तर काही गटारींचे पाणी रस्त्यांवरून वाहत असल्याने पालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच पावसाळ्याचे दिवसा असल्याने गटारींच्या काठावर गवत उगवल्याने हे गवत काढण्याची गरज आहे. रहिवासी राहुल सोनवणे यांनी ही प्रतिक्रीया दिली.

रात्री अनेक पथदिवे बंद

फरजाना खाटीक म्हणाल्या, विनोबानगर, सप्तशृंगीसह अनेक भागातील कॉलन्यांमध्ये रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरते. त्यामुळे या भागात पोल बसवून पथदिवे बसवण्याची गरज आहे. एखाद्या भ्रागात रात्री अंधार तर काही भागात दिवसाही पथदिवे सुरूच राहतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या बाबीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. दिवसा सुरू राहणारे पथ दिवे वेळेवर बंद करून विजेची होणारी नासाडी थांबवण्याची गरज आहे.

परिसरातील अनेक भागात रस्त्यांची दुरवस्था

वंदना बारी म्हणाल्या, या परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक भागातील नवीन कॉलन्यांमध्ये मोठ्याप्रमाणात खड्डे झाले आहेत.या रस्त्यांवरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. महापालिका प्रशासनाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेऊन नागरिकांचे चालणे सुसय्य करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. रात्रीच्या सुमारास अनेक भागातील पथदिवे नसतात त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे सहज दिसत नाहीत. त्यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...