आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमळनेर तालुक्यातील मठगव्हाण येथील रहिवासी व शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख किरण भालेराव पवार(48) यांचे दि. 5 रोजी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाने दुर्दैवी निधन झाले आहे. 26 एप्रिल रोजी चोपड्यातच किरणचे वडील भालेराव महादू पवार(79) याचे देखील कोरोनाने निधन झाले होते.
बुधवारी 5 तारखेला वडिलांच्या दहाव्याच्या दिवशी किरण पवार यांचे निधन झाल्यानंतर मठगव्हाण येथील पवार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चोपडा उपजिल्हा रुग्णलायत या दोन्ही पिता पुत्राने कोरोनाच्या आजाराशी लढा देताना त्याची झुंज अपयशी ठरली. किरण पवार हे अमळनेर तालुक्यात एक लढवय्या शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून संपूर्ण तालुक्याला परिचित होते. पूर्ण आयुष्य सेनेत संघर्षमय जीवन त्यांनी जगले असून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी किरण पवार यांनी वेळोवेळी लढा दिला होता. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना जाब विचारून शेतकऱ्यांसाठी ते रस्त्यावर अनेक आंदोलने त्यांनी केले होते.
किरण पवार हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना गुलाबराव पाटील याचे कट्टर समर्थक होते. म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीच अमळनेर बाजार समितीवर प्रशासक सदस्य म्हणून निवड केली होती. किरण पवार हे चोपडा नगरपालिकेचे सेनेचे नगरसेवक महेश पवार याचे चुलत भाऊ होते.
किरण पवाराचे तालुका प्रमुखाचे स्वप्न राहिले अधुरे
किरण पवार हे सध्या सेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख असले तरी ते येणाऱ्या दहा पंधरा दिवसात होणाऱ्या घडामोडीत अमळनेर तालुक्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते.
सेनेचा किरण हरपला
अमळनेर तालुक्यात किरण पवार म्हणजे एक लढवय्या शिवसैनिक होता. किरण पवार यांच्या जाण्याने अमळनेर तालुक्याच्या सेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आमचा ढाण्या वाघ आम्ही गमावला आहे.
डॉ राजेंद्र पिंगळे, उपजिल्हा प्रमुख शिवसेना अमळनेर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.