आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी अडचण:जीएमसीत डॉक्टर नसल्याने सोनोग्राफी, सीटी स्कॅन विभाग बंद; रुग्णांचे हाल

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत असलेल्या रेडिओलॉजिस्ट यांची काही महिन्यांपूर्वी बदली झाल्याने सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे विभागात मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी कनिष्ठ निवासी ३ प्रकारातील दोन डॉक्टर होते. त्यांच्या भरवशावर हे काम सुरू होते; मात्र या दोन्ही डॉक्टरांचा करार संपल्याने गेल्या दोन दिवसांपासून विभागात एकही डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे.

सीटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे विभागात नेहमीच मनुष्यबळाची कमतरता राहिली आहे. सोनोग्राफी, एक्स-रे साठी दिवसाला शंभरावर रुग्ण येतात. तर सीटी स्कॅन विभागात दिवसाला पंधरा ते वीस रुग्ण असतात. रेडिओलॉजिस्ट गेल्यानंतर सिनिअर ओपिनियनसाठी अहवाल प्रलंबित ठेवण्यात येत होते. अखेर या विभागाचा पदभार उपअधिष्ठाता डॉक्टर मारोती पोटे यांच्याकडे देण्यात आला आहे. या विभागांतर्गत सोनोग्राफी, सिटी स्कॅन आणि एक्स-रे हे तीन विभाग येतात. सोनोग्राफीमध्ये अधिकतर अत्याचाराच्या घटनांमधील तसेच गर्भवती महिला असतात. दोन दिवसांपासून विभागात एकही डॉक्टर नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहे. दरम्यान, बुधवारी याठिकाणी सकाळी ओपीडीच्या वेळेत अनेक रुग्णांना परत जावे लागले. सिटी स्कॅन रिपोर्टमध्ये काही अडचण असल्यास सिनिअर ओपिनियनसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयातून पैसे खर्च करून तपासण्या कराव्या लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...