आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष ::प्रासंगिकऐवजी विशेष बससेवा करार ; आता वर्षभर एकच दर, पूर्वी गर्दीचे वेगळे दर असायचे

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी लग्न, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलींसाठी प्रासंगिक करारासाठी भर दिला जाणार आहे. या कराराला पूर्वी प्रासंगिक / नैमित्तिक करार म्हटले जात होते. मात्र, १३ मे २०२२पासून याला ‘विशेष बससेवा करार’ असे नाव देण्यात आले आहे. नव्या नावासह पूर्वी अशा करारांतर्गत पूर्वी गर्दी, कमी गर्दीचे स्वतंत्र दर होते. आता मात्र, या गाड्यांना वर्षभर एकच दर राहणार आहे. कोरोना व एसटी संपकऱ्यांमुळे मार्च २०२०पासून ते २४ एप्रिल २०२२ दोन वर्षांचा काळ एसटीसाठी कठीण गेला. मात्र, आता उत्पन्न वाढीसाठी एसटी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून एसटीने आता प्रासंगिक / नैमित्तिक करार या नावाऐवजी ‘विशेष बस सेवा करार’ असे नाव दिले. यासाठी वर्षभर आता एकच दर राहणार आहेत. अर्थात, एसटीचे अर्थचक्र रुळावर येण्यासाठी मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...