आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगाव डाक विभागातील सर्व डाक कार्यालयांतर्गत ‘सुकन्या समृद्धी योजना खाते’ उघडण्यासाठी ९ व १० फेब्रुवारी असे दोन दिवस विशेष अभियान राबवले जाणार आहे. यात जिल्ह्यातून ३ हजार ६१३ सुकन्यांची खाती उघडण्याचे उद्दिष्ट जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे. पोस्टातर्फे आतापर्यंत ९८ हजार सुकन्यांची खाती उघडण्यात आली आहेत.
जळगाव जिल्ह्यात पोस्टाच्या ३ मुख्य कार्यालयांसह ७५ सब व ४५० हून अधिक उपकार्यालयांत ९ व १० फेब्रुवारीला हे अभियान राबवण्यात येणार आहे. यातून ३६१३ खाती उघडण्याचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले आहे. या योजनेत २५० रुपयांत खाते उघडण्यात येणार असून, खाते उघडल्यापासून १५ वर्षांपर्यंत खात्यात दरमहा बचत करावी लागणार आहे. कमीत कमी २५० ते जास्तीत जास्त दीड लाखापर्यंत आर्थिक भरणा करता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.