आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात ‘विशेष साहाय्य’ खात्याचे राज्यमंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांच्या अखत्यारीतील फर्दापूरचे महाविद्यालय परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ‘विशेष साहाय्य’ करण्याकरिता कुप्रसिद्ध आहे. या महाविद्यालयात मंगळवारी १२ वीच्या हिंदीच्या परीक्षेला परीक्षार्थी बेंचवर थेट पुस्तकाची पाने ठेवूनच उत्तरे लिहीत असताना ‘दिव्य मराठी’च्या कॅमेऱ्यात चित्रित झाले आहेत. ‘मागच्या वेळी जिथे बसला होतात तिथे बसा’ ही तिथली बैठक व्यवस्था होती.
‘दिव्य मराठी’ टीम तिथे पोहोचली तेव्हा वर्गखोल्यांच्या खिडक्या उघड्या होत्या. त्यातून बेंच दिसत होते. त्यावर एमपीएससी परीक्षेसाठीचे क्रमांक चिकटवलेले होते. १२ वी परीक्षार्थींचा क्रमांक एकाही बेंचवर नव्हता. परीक्षेसाठी विद्यार्थी त्या खोल्यांमध्ये आले तेव्हा ‘मागच्या वेळी जिथे बसला होतात तिथे बसा’ असे निर्देश पर्यवेक्षकांनी दिले.(त्याचे ध्वनिमुद्रणही आहे.) पर्यवेक्षक उत्तरपत्रिकांवर स्वाक्षरी करून जे निघून गेले ते थेट त्या संकलित करण्यासाठीच वर्गात आले. तिथे फिरणाऱ्या ‘दिव्य मराठी’ टीमला पालक समजून एका शिक्षकाने तर ‘सर्वकाही व्यवस्थित चालले आहे’ असे सांगत दिलासाही दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.