आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमळनेर आगाराची बस मध्य प्रदेशात नर्मदा नदीत कोसळून या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत जिल्ह्यातील सर्व आगारांतील चालकांना विभाग नियंत्रकांनी सावधानतेचा इशारा बैठकीतून दिला. तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास, रस्ते खचले असल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाला कळवण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच कोणतीही जोखीम न घेण्याचा सूचनाही देण्यात आल्या.
खबरदारीचा उपाय म्हणून विभागीय कार्यालयातर्फे सर्व आगारप्रमुख आणि वाहन चालकांना सूचना केल्या आहेत. यात प्राधान्याने ग्रामीण भागात चालणाऱ्या बसेस व चालकांना कटाक्षाने पुलावर पाणी वाहत असताना काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. मार्गात काही समस्या उद््भवल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षाला कळवल्यास त्या मार्गावरून जाणाऱ्या इतर बसेसलाही याची अगोदर सूचना देण्यास मदत होऊ शकते. तसेच काही मार्गांवर रस्ते खचले असल्यास तेथून प्रवास शक्य नसल्यास अशा रस्त्याने सुद्धा जाऊ नये, अशा सूचनाही कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
अपघात रोखण्याचे नियोजन अपघातांच्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्व आगारप्रमुख, वाहनचालकांना सूचनेसह खबरदारी घेण्याचे आदेशही दिले. गर्दीच्या मार्गांवर बसेस सोडण्यासह शाळकरी मुलांना अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. समस्या आल्यास नियंत्रण कक्षाला सूचना करण्यास सांगितले आहे. भगवान जगनोर, विभाग नियंत्रक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.