आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रियता:एसटीने जनमाणसात प्रवासी सेवा हे व्रत दृढ करुन लोकप्रियता टिकवून ठेवली; अभियंता श्रावण सोनवणे यांचे मत

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एसटीने जनमाणसात प्रवासी सेवेचे व्रत दृढ केले आहे. या प्रवाशांच्या जोरावर एसटीने आजपर्यंत आपली लोकप्रियता कायम ठेवली असल्याचे यंत्र अभियंता श्रावण सोनवणे यांनी बुधवारी एसटीचा वाढदिवसानिमित्ताने सांगितले. दरवर्षी १ जून रोजी प्रत्येक आगारात एसटी महामंडळाचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने गाडीला फुलांनी सजवण्यात आले होते. या सजलेल्या लालपरीला एसटी कर्मचाऱ्यांकडून नमन केले. त्यानंतर जळगाव आगातील ज्येष्ठ प्रवासी सूर्यकांत पवार (चांदसर), माधव गायकवाड (आळंदी), किसन पाटील (गाढोदे), बुधा राणे (अडावद), मीना पोद्दार (लातूर) यांचा गुलाब पुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला. गोपाळ पाटील यांनी १ जून १९४८ रोजी अहमदनगर ते पुणे बेड फोर्ड कंपनीची बस धावल्याचे प्रास्ताविकातून सांगितले. दीपप्रज्वलनानंतर बसस्थानकात उपस्थित असलेल्या प्रवाशांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कामगार अधिकारी राहुल शिरसाट, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी प्रशांत महाजन, सुरेश महाजन, आगार व्यवस्थापक पंकज महाजन, स्थानक प्रमुख मनोज तिवारी, इंटकचे नरेंद्र सिंग राजपूत, संदीप सूर्यवंशी, महेश शर्मा, यशवंत कुलकर्णी, आनंदा सोनटक्के व इतर एसटी कर्मचारी आदी उपस्थित होते.

एसटी कार्यशाळा कर्मचाऱ्यांकडून वाढदिवस साजरा कार्यशाळेत एसटी कर्मचाऱ्यांनी बसला सजवून व रांगोळी काढून एसटीचा ७४वा वाढदिवस साजरा करण्यात आला. कर्मचाऱ्यांनी लालपरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला. यावेळी सुनील नन्नवरे, भगवान भोई, अरुण श्रीखंडे, जितेंद्र फुलपगार, मनोज जगदाळे, सचिन बोरसे, शंकर वानखेडे, सीमा पाटील, मनीषा बडगुजर, कविता बारी यांच्यासह कार्यशाळेतील कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...