आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग सुरु करा; डॉ. के. बी. पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन अन् मार्गदर्शन

मुक्ताईनगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परदेशात केळी निर्यातीला मोठी संधी असून केळीवर प्रक्रिया करणारे उद्योग शोधले पाहिजेत. त्यात बनाना फायबर पासून कापड निर्मिती, चटई, पायदान, पिशव्या, पर्स, कलाकुसरीच्या वस्तू आदी सारखे विविध उद्योग स्थापन करता येतील, असा सल्ला प्रसिद्ध केळी तज्ज्ञ, जैन इरिगेशनच्या टिशू कल्चर विभागाचे उपाध्यक्ष डॉ.के.बी. पाटील यांनी दिला.

मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रोजगाराच्या संधी कशा शोधाव्यात या विषयावर त्यांचे व्याख्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग व संत मुक्ताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, केळी बरोबरच कपाशीच्या काड्या पासून कांडी कोळसा तयार करणे, सोयाबीनपासून सोया दूध तयार करणे असे विविध तेलबिया, मका, ज्वारी, गहू इत्यादी उत्पादनांवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. बहुसंख्य विद्यार्थी केळी पकेळीवर प्रक्रिया करणारे उद्योग शोधले पाहिजेत. उद्योग स्थापन करण्यासाठी लागणारे भांडवल, कच्चा माल याविषयीची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आय.डी. पाटील होते.

त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे महत्त्व पटवून दिले. स्वयंरोजगारासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच अनेक यशस्वी व्यक्तींची माहिती दिली. प्रा. एल.बी. गायकवाड, प्रा. अजित कुलकर्णी, प्रा. संजय सैंदाणे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...