आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश प्रक्रिया:इग्नू अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; 31 जुलैपर्यंत आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू), नवी दिल्लीच्या अमरावती येथील अभ्यास केंद्राअंतर्गत येणाऱ्या जुलै महिन्यापासून सुरू होणाऱ्या सत्राकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून 31 जुलैपर्यंत आवेदनपत्र स्वीकारण्यात येणार आहे.

पदव्युत्तर एम.ए. इतिहास, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, ग्रामीण विकास, इंग्रजी, हिंदी, तत्त्वज्ञान, दूर शिक्षण, समाजकार्य, जर्नालिझम व मास कम्युनिकेशन तसेच स्नातक अभ्यासक्रम सामान्य मध्ये कला, वाणिज्य आदी अभ्यासक्रमांकरिता इग्नूच्या www.ignou.ac.in वेबसाईटवरून 31 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र स्वीकारण्यात येत आहे.

प्रवेश शुल्क इंटरनेट बँकींग/ डेबीट/ क्रेडीट/ एटीएम कार्डद्वारे भरावयाचे असून सविस्तर माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा.याबाबतची माहिती इग्नूच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीकरता इच्छुकांनी विद्यापीठाच्या इग्नूचे अभ्यासकेंद्र येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...