आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता:अभ्यासक्रमांचे नियमित वर्ग सुरू करा ; विद्यापीठ

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शैक्षणिक वर्ष २०२२-२३च्या सर्व अभ्यासक्रमांचे नियमित वर्ग सुरू करण्याचे आदेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने खान्देशातील सर्वच महाविद्यालयांना दिले आहेत.

१ ऑगस्टपासून अभ्यासक्रमास सुरूवात करावी असे ६ जुलै रोजी विद्यापीठाने कळवले होते. तरी देखील अनेक महाविद्यालयांनी द्वितीय व तृतीय वर्षाचे वर्ग अद्याप सुरू केले नाहीत. या मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तथापि अभ्यासक्रमांचे वर्ग, शैक्षणिक दिनदर्शिका नियमितपणे सुरू करावी असे परिपत्रक प्रवेश व पात्रता विभागाने दोन दिवसांपूर्वी काढले आहे.

बातम्या आणखी आहेत...