आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनचा परिणाम:नाभिकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ; केस कापण्यासाठी जावे लागते घरोघरी

चोपडाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिवसातून कोणत्याही एका ठराविक वेळी काम करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी नाभिक बंधू करत आहेत

प्रवीण पाटील

पंचवीस तीस वर्षांपूर्वी ग्रामीण भागात अनेक लोकांकडे कटिंग, दाढी करण्यासाठी वर्षभर सेवा देणारे नाभिक लोक दर आठवड्यात एक दोन वेळा स्वतः घरी जाऊन संबंधीत लोकांना सेवा देण्याचे काम करत होते, त्या बदल्यात वर्षभराचे पैसे अथवा ज्वारी, बाजरी, डाळी देऊन काम करण्याची पद्दत होती. त्याला ग्रामीण भागात 'गवई' असा शब्द प्रयोग होता. एकवेळ 'गवई' घेतल्यानंतर खेड्यात नाभिक लोक हे वर्षभर सेवा दाढी, कटिंग कामासाठी घरपोहच येत असायचे. 

अशीच काही वेळ आता कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आल्याचे शहरा सह ग्रामीण भागात दिसून येत आहे. संपूर्ण गावात संचार बंदी काळात दुकाने बंद असल्याने नाभिक समाजावर खऱ्या अर्थाने उपासमारीची वेळ आली असून दुकाने बंद असली तरी आपण घरोघरी जाऊन कटिंग, दाढी करून दोन पैसे मिळाले तर घरात किराणा होईल आणि अडचण दूर होईल म्हणून नाभिक बंधू घरोघरी जाऊन सेवा देत आहेत.

ग्रामीण भागात घरोघरी नाभिक लोक येत असल्याने गेल्या वीस पंचवीस वर्षाची वेळ पुन्हा आली आहे असे बोलले जात आहे. चोपडा शहरातील नाभिक बंधूशी संवाद साधला असता त्यांनी सागितले की, "आमच्यावर सध्या अत्यंत वाईट अवस्था आली आहे. हातात पैसे येत नसल्याने मोठी चणचण भासते, दुकाने बंद असल्याने परिवार चालवणे कठीण होत आहे. आम्हाला देखील सोशल डिस्टंसिंगचे नियम ठरवून किमान दिवसभरात सकाळी व सायंकाळी वेळ ठरवून द्यावी अशी आमची मागणी आहे."

बातम्या आणखी आहेत...