आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य शासकीय कर्मचारी पतपेढी निवडणूक:उद्या होणार मतदान; सात विरुध्द दोन उमेदवारांमध्ये लढत

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी सहकारी पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणूक दोन उमेदवार ठाम राहिल्याने बिनविरोध झाली नाही. आता एकता पॅनलचे सात उमेदवार विरुध्द इतर दोन उमेदवार अशी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया होणार आहे.

महसूल विभाग,न्यायालयीन कर्मचारी,विक्रीकर कार्यालय,पाटबंधारे विभाग,आयटीआय कर्मचारी,जिल्हा कोषगार कार्यालय कर्मचारी,सहकार विभाग कर्मचारी,आश्रम शाळा कर्मचारी,जिल्हा रुग्णालय अशा विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी राज्य शासकीय कर्मचारी पतपेढीचे सभासद आहेत.या पतपेढीसाठी भटक्या विमुक्त जाती,जमाती,एस्सी महिला व सहा सर्वसाधारण प्रवर्गातून असे एकूण 11 संचालक निवडून द्यावयाचे आहेत.या निवडणुकीत जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार देवेंद्र चंदनकर यांचे एकमेव एकता पॅनल निवडणूक रिंगणात आहे.

एकताचे चार उमेदवार बिनविरोध

एकता पॅनलचे जे.एम.एफ.सी.कोर्ट 2 च्या वरिष्ठ लिपिक शोभा डिगंबर जाधव,मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प निदेशक ज्योती विलास भोळे,पिंप्राळ्याचे मंडळ अधिकारी किरण खंडू बाविस्कर व पाटबंधारे यांत्रिकी विभागातील वरिष्ठ लिपिक संतोष वसंत चौधरी हे चार उमेदवार बिनविरोधत निवडून आले आहेत.

नऊपैकी सर्वाधिक मते मिळणारे सहा उमेदवार होणार विजयी

एकता पॅनलविरुध्द भटक्या विमुक्त जाती,जमाती प्रवर्गातून रवींद्र गायकवाड हे उमेदवार आहेत. त्यांची सर्वसाधारण प्रवर्गातूनही उमेदवारी आहे. तर पाटबंधारे विभागाचे भरत वाकचौरे यांची सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी आहे.त्यांच्या विरुध्द एकता पॅनलचे निवासी नायब तहसीलदार दिलिप रामदास बारी,सीजेएम कोर्टातील वरिष्ठ लिपिक भारत दत्तू बारी, जिल्हा व सत्र न्यायालयातील अधीक्षक वसंत श्रीकृष्ण काळकर,जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून दिनकर केशव मराठे,चोपड्याचे मंडळ अधिकारी रवींद्र भगवान माळी, सिव्हील हॉस्पीटलचे क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी मोहनदास उत्तम पाटील हे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणूक रिंगणात आहेत.भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून जे.एम.एफ.सी.कोर्टमधील कनिष्ठ लिपिक मयूर नरेंद्र चंदनकर हे एकता पॅनलचे उमेदवार आहेत.या नऊ उमेदवारांमधून सर्वाधिक मते मिळवणारे उमेदवार निवडून येणार असून संचालक बनणार आहेत.

निवडून आल्यास दिलिप बारी चेअरमन...

एकता पॅनलतर्फे निवासी नायब तहसीलदार दिलिप बारी हे चेअरमनपदाचे उमेदवार आहेत.या निवडणुकीत ते निवडून आल्यास जिल्हा राज्य शासकीय कर्मचारी सहकारी पतपेढीचे चेअरमन होवू शकतात.या निवडणुकीसाठी रविवारी जि.प.विद्यानिकेतन शाळा,शिवतीर्थ मैदान येथे मतदान प्रक्रिया होणार आहे

बातम्या आणखी आहेत...