आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तृत्व स्पर्धा:कांताबाई जैन स्मृतीनिमित्त राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्व. कांताई यांच्या श्रद्धावंदन दिनानिमित्त मंगळवारी वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. तीन गटात झालेल्या या स्पर्धेत रणवीर साळुंखे, सृष्टी कुळकर्णी व वेदांत चौधरी हे प्रथम आले.

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पाचवी ते सातवीच्या पहिल्या गटात प्रथम क्रमांकाने चाळीसगाव येथील डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयाचा रणवीर योगेश साळुंखे, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक शेंदुर्णी माध्यमिक विद्यालयाचा अथर्व तुषार पाटील, नागलवाडीचे माध्यमिक विद्यालयाची मुग्धा विजय याज्ञिक, आठवी ते दहावीच्या दुसऱ्या गटात झांबरे विद्यालयाची सृष्टी विशाल कुळकर्णी प्रथम, रोशनी देविदास पाटील द्वितीय, सुमीत दीपक खैरे तृतीय आला.

अकरावी ते बारावीच्या तिसऱ्या गटात प्रथम चोपडाचे पंकज माध्यमिक विद्यालयाचा वेदांत पांडुरंग चौधरी, द्वितीय वाकोदचा जैन माध्यमिक विद्यालय व शेंदुर्णीचे गरुड महाविद्यालयाची प्रीती समाधान मोहिते व दिव्या संतोष चौधरी, तृतीय क्रमांक रेणुका सीताराम सानप आली. पारितोषिक वितरणावेळी ज्येष्ठ पत्रकार हेमंत अलोने, सतीश काशिद, जैन इरिगेशनचे मीडिया विभागाचे प्रमुख अनिल जोशी, जैन फार्मचे व्यवस्थापक विनोदसिंग राजपूत, पोलिस पाटील, संतोष देठे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...