आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहतनूर धरणातून आवर्तन न सुटल्याने गेल्या १५ ते २० दिवसांपासून वरणगाव शहरासह परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती. त्यामुळे हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यात यावे, या मागणीसाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी चार तास हतनूर धरणावर ठिय्या आंदोलन केले. माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजप शहराध्यक्ष गोलू राणे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, तालुकाध्यक्ष साबीर कुरेशी, फझल नुरमोहहमद, सुरेश महाजन, सूपडू पाटील, वासुदेव इंगळे, सचिन महाजन, सुनील माळी, आकाश निमकर, तेजस जैन, ज्ञानेश्वार घाटोळे आदी उपस्थित होते. वरणगाव शहरात पंधरा दिवसांपासून पिण्याचे पाणी नाही. यासाठी भाजपने चार तास ठिय्या आंदोलन केला. चार दिवसांपासून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर, मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या. नंतर आवर्तन सुटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.