आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लालपरी:एसटीला लग्न तिथी पावली,‎ एका दिवसात काेटींची कमाई‎; लग्नतारखांच्या दिवशी प्रवाशांचा कल एसटीकडे‎

जळगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी प्रशासनाने प्रवाशांना अधिक‎ चांगल्या सुविधा देत एकाच दिवसात १‎ कोटी २ लाखांचे उत्पन्न मिळवले‎ असल्याची माहिती विभाग नियंत्रक‎ भगवान जगनोर यांनी दिली. रविवारी‎ (ता.७) लग्नाची मोठी तिथी या‎ उत्पन्नास कारण ठरली आहे.‎

विशेषत: महिला प्रवाशांच्या निम्मे‎ तिकिटासह अन्य सवलतींचे मूल्य‎ सोडून ही रक्कम एसटीने प्राप्त केली‎ अाहे. २ लाख ७९ हजार किलोमीटरचा‎ प्रवास विभागाने केला. सवलतीचे १‎ लाख ६२ हजारांचे उत्पन्न वगळून ही‎ कमाई साधली आहे. आतापर्यंत‎ नियमित ८५ लाखांपर्यंतचा आकडा पार‎ करीत १ कोटी २ लाखांपर्यंत पोहाेचला.‎

आगामी लग्नसराईत बसेसची संख्या‎ वाढवून अधिक सुविधा देत हा आकडा‎ दीड कोटीपर्यंत नेण्याचे नियोजन अाहे,‎ त्यासाठी सर्व अधिकारी , कर्मचाऱ्यांची‎ साथ मिळते अाहे. असे विभाग नियंत्रक‎ भगवान जगनाेर यांनी सांगितले.‎