आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या छेडछाडीवरून दगडफेक:दोन गटांच्या वादात दोघांचे डोके फुटले, पोलिसांकडून संशयितांची धरपकड सुरू

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नशिराबाद गावात काही तरुण महिलांना पाहून शिट्या मारत होते. त्यांची छेड काढत होते. त्यामुळे गावातील एका तरुणाने त्यांना हटकले. याचा राग आल्यामुळे झालेल्या वादातून दोन गटात दगडफेक झाली. मंगळवारी सायंकाळी नशिराबाद गावात ही घटना घडली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस संशयितांची धरपकड करत आहेत.

फजलखान फरीदखान (वय १८) याने दिलेल्या तक्रारीनुसार, रुपेश माळी, वासू माळी, विनोद माळी व गणेश माळी हे तरुण नशिराबाद बसस्थानकाजवळ उभे होते. ते रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिलांना शिट्या मारुन त्यांची छेड काढत होते. त्यामुळे फजलखान याने त्यांना हटकले. याचा राग आल्यामुळे तरुणांनी फरीदखानसह त्याचा चुलत भाऊ दानिशखान यांच्यावर दगडफेक केली. दोघांची डोकी फोडली. या प्रकारामुळे प्रचंड गोंधळ उडाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाद मिटवला.

याच प्रकरणी सतीश कडू महाजन यांनीदेखील तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, दानिशखान, फजलखान, मोहम्मद रिक्षावाला, शाहिस्ताबी आसीफ खान यांनी महाजन यांचा पुतण्या गौरव याला मारहाण केली. गौरव व लकी महाजन या दोघांना दगड, वीटांनी मारहाण केली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...