आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयराम रमेश यांचा भाजपला चिमटा:काँग्रेस नेत्यांची बदनामी थांबवा, भाजपबद्दल सत्य बाेलणे थांबवू

जळगाव जामोद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्ष ज्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बदनामी करणे थांबवेल, त्या दिवशी आम्हीही आरएसएस व भाजपबद्दल सत्य सांगण्याचे बंद करू, असा चिमटा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत घेतला. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. या वेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांचाही समाचार घेतला.

भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. छत्रपतींची तुलना भाजपच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आह. अशा वादग्रस्त राज्यपालांची तत्काळ हकालपट्टी करा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपच्या प्रवक्त्याने अकलेचे तारे तोडले त्याबद्दल भाजपने जाहीर माफी मागावी, अन्यथा भाजपच्या नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...