आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धंदे:जळगाव जामोद येथील अवैध धंदे बंद करा ; संजय पारवे यांची बच्चू कडू आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

बिलढाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह ग्रामीण भागातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक संजय पारवे व डॉ. शाकीर खान यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व बच्चू कडू यांच्याकडे केली आहे. तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. अवैध धंद्यांतून जनतेची लूट होत आहे. त्यामुळे सामान्य आर्थिक दुर्बलांच्या सर्वांगीण भविष्यासाठी सर्वांना शिक्षण घेता यावे, यासाठी अवैध धंदे त्वरित बंद करून अवैध धंद्यांना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक संजय पारवे व डॉ. शाकीर खान यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...