आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेक:कंजरवाड्यात जुन्या वादातून तुफान दगडफेक; पोलिसांच्या वाहनासह पाच दुचाकी फोडल्या

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंजरवाडा भागात जुन्या वादातून मंगळवारी रात्री ९.३० वाजता दोन गटात तुफान दगडफेक झाली. त्यात चार ते पाच दुचाकींसह पोलिसांचे वाहनाचे नुकसान झाले. एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

श्रीराम नवमीच्या दिवशी सम्राट कॉलनीत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात दिव्यकांत बागळे या युवकाला लक्ष्मी नगरातील तीन ते चार तरुणांनी मारहाण केली होती. त्यानंतर मुलाला का मारले? याचा जाब विचारण्यास गेलेल्या दिव्यकांतच्या आईला तरुणांनी मारहाण केली होती. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. मंगळवारी रात्री ९.३० वाजता लक्ष्मी नगरातील ते तरूण कंजरवाडा येथे दुचाकीने आले. त्यांनी कंजरवाड्यात वाद घातला. वादाचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाले. त्यात चार ते पाच दुचाकींची तोडफोड सुध्दा केली. कंजरवाड्यात दगडफेक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाला पिटाळून लावले.

बातम्या आणखी आहेत...