आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव बेवारस कुत्र्यांनी साेमवारी चार बालकांना जखमी केले आहे. शिव काॅलनीत हळदीच्या कार्यक्रमाला आलेल्या सात वर्षीय बालकाला चावा घेतला. तर हरिविठ्ठलनगरात अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षीय बालिकेला दाेन ठिकाणी चावा घेतला आहे.
जिल्ह्यात आणखी बालकांना कुत्रे चावल्याने त्यांना जीएमसी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नक्की झाले काय?
शिव काॅलनीतील गट नंबर ५९ मध्ये गजानन दयाराम पाटील यांचा मुलगा दीपक पाटील यांचे मंगळवारी लग्न आहे. त्याच्या हळदीचा कार्यक्रम साेमवारी हाेता. त्यासाठी अलवाडी (ता. चाळीसगाव) येथून आलेल्या नील पंकज पाटील (वय ७) हा बालक आई-वडिलांसाेबत आला हाेता. दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास ताे मंडपात फिरत असताना अचानक तीन भटके कुत्रे आले व त्यांनी त्याला खाली पाडून चावा घेतला.
या वेळी जवळच असलेल्या कुटुंबीयांना त्याला कुत्र्यांच्या ताब्यातून साेडवले. त्याच्या पाठीवर कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तसेच साेमवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास हरिविठ्ठलनगरातील जुना बाजार पट्ट्यात राहणार उत्तरा रवींद्र पाटील (वय ५) ही बालिका आई मंदिरात गेल्याने घराच्या अंगणात खेळत हाेती. या वेळी अचानक एक कुत्रा आला, त्याने तिला डाव्या हाताला व पायाला चावा घेतला. तिच्यावर उपचार करण्यात आले.
आणखी दाेघांना चावा
पाचाेरा तालुक्यात वडगाव मुळाणे येथे राहणारे मयूर हिरामण पवार (वय १२) याच्या मांडीवर कुत्र्यांनी चावा घेतला आहे. तर हमीद तडवी यालाही कुत्र्याने चावा घेतल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. राेहित वरे (वय २९), याेगेश काेळी (वय २७, रा. पिंप्राळा) या दाेघांनाही कुत्र्यांनी चावा घेतल्याने जीएमसीत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.