आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:पोलिस कर्मचाऱ्यांसाठी ताण-तणाव व्यवस्थापन कार्यशाळा ; ताण कसा घालवावा यावर मार्गदर्शन

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे शहर व शनिपेठ पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांसाठी शनिवारी ताणतणाव व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत नितीन विसपुते यांनी ताण निर्माण करणारे घटक, ताणाचे नियोजन, ताण कसा घालवावा यावर मार्गदर्शन केले. जीवनात एकापाठोपाठ एक समस्या येत असतात. त्यावर आपण कशी मात केली पाहिजे, समस्यांना आपण कसे सोडवले पाहिजे यावर त्यांनी गोष्टींच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. त्याचबरोबर १४ अक्षरी मंत्र देखील दिला. आपल्याकडे जर कुणाच्या काही वस्तू असतील तर ज्याचे त्याला देऊन टाका. एखादी काम असेल तर ते काम जेव्हाच्या तेव्हा त्याला पूर्ण केले तर ताण निर्माण होत नाही. १३८चा मंत्रदेखील सर्व पोलिस बांधवांना दिला. १३८ मधील एक म्हणजे एक तास व्यायाम करा, तीन वेळा जेवण आणि आठ तास गाढ झोप घेणे असा आहे. यातून आपले हॅपी हार्मोन्स वाढत असतात. एक नवीन ऊर्जा मिळत असते. कामाच्या ताणापासून थोड्या प्रमाणात मुक्ती मिळावी यासाठी त्यांनी काही टेक्निक्सदेखील सांगितल्या. त्यात पिटो टेक्निक, संमोहन पद्धत, ध्यान धारणा या पद्धतीचा अवलंब करावा असे सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, बळीराम हिरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...