आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:‘डेथ क्लॉक’ वेबसाइट पाहून जळगावात आठवीतील विद्यार्थ्याने केली आत्महत्या

जळगाव2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेबसाइटवरील कॅलक्युलेटरवर मृत्यूचे भाकीत बघून विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले

शहरातील तुकारामवाडी येथील मामाच्या घरी गेल्या चार महिन्यांपूर्वी राहण्यासाठी आलेल्या आठवीच्या विद्यार्थ्याने प्रजासत्ताकदिनी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरात साडीने गळफास लावून आत्महत्या केली. ‘द डेथ क्लॉक’ या वेबसाइटवर आयुर्मान कॅलक्युलेटरवर मृत्यूचे भाकीत बघून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप करून नातेवाइकांनी ते संकेतस्थळ बंद करण्याची मागणी केली.

हर्षल दीपक कुंवर (वय १४, रा. शिंदखेडा, जि. धुळे) असे मृत मुलाचे नाव आहे. हर्षल हा आठवीच्या वर्गात शिकत होता. चार महिन्यांपूर्वी तो जळगाव शहरातील तुकारामवाडी येथे राहणारे दीपक गोकुळ भदाणे या आपल्या मामाकडे राहण्यासाठी आला होता.

वेबसाइटवरील मृत्यूचे भाकीत तथ्यात्मक नाही

त्या वेबसाइटवर भाकीत दिले आहे. त्यांच्याकडे लाखो लोकांचा डाटा असू शकतो. त्याला अधिकृतता नाही. कोण किती दिवस जगणार हे कुणीच सांगू शकत नाही. वेबसाइटवर आऊटलूक परिमाण आठवीच्या मुलाला समजणे अवघड आहे. त्यामुळे मुलांवर पालकांनी लक्ष ठेवावे, असे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणक प्रशाळेचे प्रमुख डॉ.राम भावसार व पोलिस दलातील सायबरतज्ज्ञ नरेंद्र वारुळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...