आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाताळ साजरा:शाळांमध्ये वर्ग सजवून विद्यार्थ्यांनी केला‎ नाताळ साजरा; सांताक्लाॅजचे आकर्षण‎

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎शाळांमध्ये ख्रिसमसनिमित्ताने‎ सेलिब्रेशन करण्यात आले. तसेच‎ नाताळनिमित्ताने शाळेतील वर्ग‎ पताका, फुगे, तोरण लावून‎ सजवण्यात आले. नाताळच्या‎ सेलिब्रेशनसाठी विद्यार्थी‎ सांताक्लॉज, मदर मेरी, परी, शेफर्ड‎ अशा विविध वेशभूषेत आले होते.‎ न्यू इंग्लिश स्कूल :‎ नाताळनिमित्ताने शाळेतील वर्ग‎ पताका, फुगे, तोरण लावून‎ सजवण्यात आली.

हा कार्यक्रम‎ मुख्याध्यापक योगेश चौधरी यांच्या‎ मार्गदर्शनात घेण्यात आला.‎ लाठी विद्यामंदिर :‎ नाताळनिमित्ताने विद्यार्थ्यांनी जिंगल‎ बेल या गाण्यावर नृत्याचा आनंद‎ लुटला. माधुरी पाटील यांनी नाताळ‎ सणाबाबत मार्गदर्शन केले. हा‎ कार्यक्रम मुख्याध्यापिका अंजली‎ बागुल यांच्या मार्गदर्शनात घेण्यात‎ आला. कार्यक्रमासाठी उषा सोनार,‎ लता जाधव, हर्षा नागला व इतर‎ शिक्षकांनी सहकार्य केले.‎

कमल वाणी विद्यामंदिर :‎ नाताळनिमित्ताने ख्रिसमस ट्री,‎ गायीचा गोठा, गिफ्ट व सांताक्लॉज‎ यांच्या प्रतिकृतीला रोषणाईने‎ सजवण्यात आले होते. या निमित्ताने‎ विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.‎ मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी यांनी‎ मार्गदर्शन केले. या वेळी नीलेश‎ नाईक उपस्थित होते. उज्ज्वला‎ जाधव यांनी सूत्रसंचालन केले.‎

बातम्या आणखी आहेत...