आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Students Deprived Of Pharmacy CET Due To Wrong Timing Given On Admit Card Itself, Afternoon Timing Was Given But According To The System The Exam Was Held In The Morning.

घोळ:प्रवेशपत्रावरच चुकीची वेळ दिल्याने फार्मसीच्या सीईटीपासून विद्यार्थी वंचित, दुपारची वेळ देण्यात आली, पण सिस्टिमनुसार सकाळीच परीक्षा

जळगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीईटी सेलतर्फे १२ ऑगस्टपासून पीसीबी ग्रुपची प्रवेशपूर्व परीक्षा सुरू आहे. जळगाव शहरात १८ रोजी एका विद्यार्थ्याच्या प्रवेशपत्रावर दुपारची वेळ तर सीएईटी सेलच्या सिस्टिमवर याच विद्यार्थ्याच्या परीक्षेची सकाळची वेळ असल्याने गोंधळ उडाला. दरम्यान, सिस्टिमनुसार दुपारी या विद्यार्थ्याची नोंद नसल्याने विद्यार्थ्याला परीक्षेला मुकावे लागले. याबाबत विद्यार्थ्याने सीईटी सेलकडे तक्रार करत आपली परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. शहरात चार केंद्रांवर सध्या पीसीबी ग्रुपची सीईटी सुरू आहे. दररोज दोन सत्रांत ही परीक्षा सुरू असून सकाळी ९ ते १ आणि दुपारच्या सत्राची परीक्षा २ ते ५ या वेळेत घेण्यात येत आहे. शहरातील भावेश नरेंद्र गुरव या विद्यार्थ्याने परीक्षेच्या चार दिवस आधीच परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड केले होते. त्यानुसार गुरुवारी पाळधी येथील एसएस सिस्टिमच्या केंद्रावर दुपारच्या सत्रात पेपर होता. प्रवेशपत्रानुसार दुपारी १ वाजता परीक्षा केंद्रावर पोहाेचल्यानंतर या विद्यार्थ्यांचा पेपर सकाळच्या सत्रात असल्याचे समजले. प्रवेश पत्रावर दुपारची वेळ तर सीईटी सेलच्या सिस्टिमनुसार याच विद्यार्थ्यांच्या परीक्षेची सकाळची वेळ दिसून आल्याने केंद्रप्रमुखही गोंधळले. सिस्टिममध्ये विद्यार्थ्याची अनुपस्थिती लागल्याने अखेर परीक्षा न देताच विद्यार्थ्याला माघारी परतावे लागले.

सीईटी सेलकडून उत्तर नाही सीईटी सेलच्या चुकीमुळे पेपर देता आला नाही. याबाबत ई-मेलद्वारे सीईटीला कळवण्यात आले असून अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. परीक्षा न झाल्यास प्रवेशापासून वंचित राहावे लागेल. - भावेश गुरव, परीक्षार्थी

बातम्या आणखी आहेत...