आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास दौरा:विद्यार्थ्यांनी अनुभवला गांधीजींचा जीवन प्रवास ;संपुर्ण कार्याची देण्यात आली माहिती

जळगाव8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्यन इंटरनॅशनल स्कूलच्या ९२ विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा गांधी तीर्थ येथे घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांना गांधी तीर्थ म्युझियम मधील गांधीजींच्या बालपणीच्या प्रसंगापासून ते स्वातंत्र्याच्या कार्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हा अभ्यास दौरा डॉ. केदार थेपडे व सुषमा थेपडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. या वेळी मुख्याध्यापिका सुमैया पटेल, उपमुख्याध्यापक अविनाश जावळे, संगीता बाहेती, भाग्यश्री धाडकर, मीना सोनवणे, उज्ज्वला महाजन आदी उपस्थित होते. दरम्यान, महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य चळवळीत असलेले याेगदान, त्यांची कार्याची पद्धती अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना या दाैऱ्यात प्रभावी मार्गदर्शन करण्यात आले.