आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहावीच्या परीक्षेचा सोमवारी इंग्रजी या विषयाचा पेपर झाला. शहरातील प. न. लुंकड कन्या शाळेतील केंद्रावर मराठी माध्यमातील २४ विद्यार्थ्यांना काठिण्य पातळी जास्त असलेल्या इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका दिली गेली. या वेळी काही विद्यार्थ्यांनी हा प्रकार सुपरवायझर यांच्या लक्षात आणून दिला. मात्र, तरीदेखील दखल घेतली गेली नसल्याचा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला. तर विद्यार्थ्यांनी पेपर सुटण्याच्या १० मिनिटे आधी हा प्रकार सांगितल्याचे मुख्याध्यापिका स्वाती नेवे यांचे म्हणणे आहे. नेवे यांनी सांगितल्यानुसार हा प्रकार उशिराने सांगितला. त्यानंतर बोर्डाला फोनवरून कळवले. या संदर्भात अहवाल पाठवण्याचे आदेश बोर्डाने केले आहेत. त्यानुसार अहवाल पाठवला, असे त्यांनी सांगितले.
असा आहे दोन्ही विषयातील फरक
दहावीच्या इंग्रजी माध्यम आणि सेमी व मराठी माध्यम या विषयांत फरक आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी हा फर्स्ट लँग्वेज विषय असतो. त्यांची काठिण्य पातळी जास्त असते. मराठीत भाषांतर करा, असा प्रश्न इंग्रजी माध्यमाला नसतो. तर मराठी किंवा सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना इंग्रजी थर्ड लँग्वेजचा विषय असतो. त्याची काठिण्य पातळी कमी असते. मराठीत भाषांतरांचा प्रश्न त्यांना असतांे.
मुख्याध्यापिका नेवे यांना थेट प्रश्न
प्रश्न : मुलांनी प्रकार लक्षात आणून दिला तरीही तातडीने दखल का घेतली नाही? उत्तर : नाही. मुलांनी लागलीच ही चूक लक्षात आणून दिली नाही. पेपर संपण्याच्या वेळी सांगितले. अन्यथा उपाययोजना करता येणे शक्य झाले असते. प्रश्न : चूक नेमकी कोणाची आहे असे वाटते? उत्तर : वर्गावर असलेल्या पर्यवेक्षकाची ही चूक असल्याचे म्हणता येईल. त्यांनी प्रश्नपत्रिकेवरील कोड नंबर बारकाईने तपासून घ्यायला पाहिजे होता. प्रश्न : लवकर हा प्रकार लक्षात आला असता तर तुम्हाला काय करता आले असते? उत्तर : माझ्यापर्यंत हा प्रकार तत्काळ आला असता, तर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका बदलून देता आली असती. पेपरची वेळ संपल्याने नाइलाज झाला. प्रश्न : बोर्डाला तुम्ही काय कळवले आहे? उत्तर : घडलेला प्रकार बाेर्डाला कळवून वस्तुनिष्ठ अहवाल पाठवला आहे. यानंतर बोर्ड आदेश करेल, त्याप्रमाणे आम्ही पुढील कार्यवाही करणार आहाेत.
केंद्र संचालक, उपसंचालक, पर्यवेक्षकांचा अहवाल
घडलेल्या प्रकारासंदर्भात मुख्याध्यापिका स्वाती नेवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली. केंद्र संचालक, केंद्र उपसंचालक व सुपरवायझर या तिघांचा लेखी अहवाल नाशिक बोर्डाला पाठवला आहे. हा अहवाल ८ मार्च रोजी नाशिक येथे पोहोचेल. यानंतर बोर्ड ठरवेल तशी कार्यवाही करू असे उत्तर नेवे यांनी दिले. दरम्यान, या प्रकाराने विद्यार्थ्यांच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बाेर्डानेही दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांनी आेरड करताच जर लक्ष दिले गेले असते तर हा प्रकार राेखता येणे शक्य हाेते.
अशी केली पाहिजे होती कार्यवाही
हा प्रकार पेपर सुरू झाल्यानंतर लागलीच लक्षात आला असेल तर संबंधित सुपरवायझरने केंद्र संचालकांच्या निदर्शनास आणून दिला पाहिजे होता. खात्री केल्यानंतर बोर्डाच्या परवानगीने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका बदलून देता आली असती. तसेच वेळही वाढवून देता आला असता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.