आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोफत शिक्षणाचा अधिकार या योजनेनुसार 25 टक्के प्रवेश अंतर्गत 2022-2023 वर्षांकरिता प्रतीक्षा यादी जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील 594 विद्यार्थांचा यात समावेश आहे. 3 जून पर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात आली होती मात्र प्रवेश निश्चित न झाल्याने 6 जून पर्यंत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी 2022-23 च्या शैक्षणिक वर्षाकरिता जळगाव जिल्ह्यात एकूण 594 विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर झालेली आहे. त्यापैकी शनिवारपर्यंत 364 प्रवेश निश्चित झाले आहे.
6 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी त्यांच्या लॉगिनमधून ॲलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी, सदर ॲलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेवून नजिकच्या गटसाधन केंद्र पंचायत समिती व शहरासाठी मनपा शिक्षण मंडळ कार्यालय येथे संपर्क साधावा आणि आपल्या बालकाचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेवून शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले आहे.
285 शाळांमध्ये प्रक्रिया
यंदा जळगाव जिल्ह्यातील 285 शाळांमधील 3147 जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यानुसार 2940 विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील 2940 पैकी 2173 विद्यार्थ्यांनीच मुदतीअंती प्रवेश निश्चिती केली. तर प्रतीक्षा यादीतील 594 विद्यार्थ्यांपैकी 264 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.