आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Students Presented 65 Paintings In Asaeedya Public School's Activity Exhibition; The Meaning Of Bahinabai's Poems Is Told Through Pictures| Marathi News

दिव्य मराठी विशेष:आसाेद्याच्या सार्वजनिक विद्यालयाचा उपक्रम प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मांडली ६५ चित्रे; चित्रांतून सांगितला बहिणाबाईंच्या कवितांचा अर्थ

जळगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेवा गणबाेलीतून साेप्या शब्दात जीवनाचं तत्त्वज्ञान व्यक्त करणारे बहिणाबाई चाैधरींचं काव्य आहे. माहेर, संसार, प्राणी, निसर्ग, कृषी जीवन त्यांच्या काव्यातून अनुभवायला येते. त्यांचे हेच काव्य विद्यार्थ्यांनी चित्रांतून रेखाटून लक्ष वेधले. बहिणाबाईंचं माहेर असलेल्या आसाेदा येथील सार्वजनिक विद्यालयाने हा उपक्रम राबवला.

कवयित्री बहिणाबाई चाैधरी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले. ‘बहिणाबाईंच्या कविता आणि त्या कवितांचा आशय घेऊन चित्र रेखाटणे’ असा या उपक्रमाचा विषय हाेता. त्यात विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या ६५ चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. साहित्याची अभिरुची निर्माण व्हावी, काव्य प्रकार कसा असताे हे विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष विलास चाैधरी यांनी या चित्रप्रदर्शनाचे उद‌्घाटन केले. पर्यवेक्षक डाॅ. मिलिंद बागूल, ज्येष्ठ शिक्षक एल. जे. पाटील, मीनाक्षी काेल्हे उपस्थित हाेते. उपक्रमासाठी भावना चाैधरी यांच्यासह आयाेजन समितीच्या सदस्यांनी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात जी चित्रे रेखाटली ती सर्वच बाेलकी आहेत. ग्रामीण, कृषी संस्कृती, नातेसंबंधांचे पैलू उलगडून दाखवणारी आहेत. निसर्ग कवयित्री बहिणाबाईंच्या जात्यावरच्या ओव्या समजून घेण्याची संधी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली, असे मान्यवरांनी उद‌्घाटन सत्रात आवर्जून नमूद केले.

‘माहेर’ चित्रकाव्य भावले प्रदर्शनात; अनेक कवितांच्या ओळी भिडल्या काळजाला
बहिणाबाई चाैधरी यांच्या ‘माहेर’ कवितेवर आधारित काढलेले चित्रकाव्य उपस्थितांना अधिक भावले. चित्राच्या शेजारी लिहिलेल्या ‘बापाजीच्या हावेलीत येती शेट शेतकरी, दारी खेटराची रास घरी भरली कचेरी’ या कवितेच्या ओळी लक्षवेधी ठरल्या. ‘उठ सासूरवाशीण बाई उठ मध्यमराती मांड दयन तू नीट, उठ सासूरवाशीण बाई उठ रामप्रहारी डाेईवर घे घडा उठ बांग फुके काेंबडा’ या सारख्या अनेक आेळीही काळजाला भिडणाऱ्या ठरल्या. विद्यार्थ्यांची कल्पकता आणि त्यांचे रसग्रण, आकलनक्षमतेचे उपस्थित मान्यवरांनी काैतुक केले.

बातम्या आणखी आहेत...