आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी निकाल:निकालानंतर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध ; संस्थाचालकांनी केला सत्कार

जळगाव25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीच्या सर्व शाखांचा बुधवारी दुपारी ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला. कला, वाणिज्य, विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी यंदाही यशाची कमान कायम राखली आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आाहे. तर अनेक विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवले. त्यांचे पालकांसह प्राध्यापक तसेच संस्था चालकांनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे वेध लागले आहेत.

एनइएस हायस्कूलमध्ये मुलींचेच वर्चस्व

पारोळा | येथील एन. इ. एस. उच्च माध्यमिक विद्यालयातील विज्ञान शाखेच्या बारावीचा १०० टक्के निकाल आहे. यात रुचिता अतुल ब्राह्मणकर हिने ८४.५० टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम, संस्कृती राजेश पवार हिने ८३.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर दर्शना संतोष बोरसे हिने ८२.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे, सचिव मिलिंद मिसर यांच्यासह सर्व संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांसह पालकांनी कौतुक केले आहे.

ज्ञानदीप शाळेचा ९८ टक्के निकाल

पारोळा | येथील ज्ञानदीप बहुउद्देशीय विद्या प्रसारक मंडळ संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा ९७.८७ व विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत लतिका शांताराम पाटील (७८.१७%) हिने प्रथम, कशिश सुनील मराठे (७७.६७%) द्वितीय तर प्रियंका अशोक महाले (७७.३३%) हिने तृतीय क्रमांक मिळवला. कला शाखेत भाग्यशाली अरुण भोसले (७२.३३%) हिने प्रथम, महेक आरिफ खाटीक(६९.८३%) द्वितीय तर सुवर्णा काशीनाथ मराठे (६७.८३%) हिने तृतीय क्रमांक पटकावला. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भैय्यासाहेब पवार, सचिव सरिता देशमुख, प्राचार्य कमलेश देवरे, राहुल बाविस्कर, संदीप पवार, सुवर्णा पाटील, उर्मिला पाटील, किशोर पाटील व शिक्षक, कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे बारावीत यश

पारोळा | येथील राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयातील विज्ञान विभागाचा बारावीचा १०० टक्के निकाल लागला आहे. तर महाविद्यालयाचा सरासरी ९७.३८ टक्के निकाल लागला आहे. यात कला शाखेचा ९२.४१ टक्के निकाल जाहीर झाला आहे. यात विज्ञान विभागात कुंजन मनोज पाटील याने ८५ टक्के गुण मिळवून प्रथम, साक्षी सुनील पाटील हिने ८४.५० टक्के गुण मिळवून द्वितीय, निखिल राजेंद्र पाटील व दीपाली दिनेश बारी या दाेघांना ८३.८३ टक्के गुण मिळवून विभागून तृतीय क्रमांक मिळाला आहे. तर कला विभागात अर्पिता संभाजी पाटील हिने ७७.५० टक्के गुण मिळवून प्रथम, सुवर्णा आनंदराव पाटील हिने ७७.१७ टक्के गुण मिळवून तर ऋतुजा प्रवीण पाटील हिने ७४.१७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. वसंतराव मोरे, सर्व संचालक, प्राचार्य, पर्यवेक्षक, सर्व कर्मचाऱ्यासह पालकांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

शेंदुर्णीच्या गरूड विद्यालयाचा १०० टक्के निकाल

शेंदुर्णी | येथील गरुड माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विज्ञान विभागाचा १०० टक्के निकाल तर किमान कौशल्य विभागाचा ९८.२१ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान विभागातून बारी पायल गणेश हीने ८५.६७ टक्के गुण मिळवत प्रथम, भावसार राणी संजीव हिने ८५.४५% द्वितीय तर जैन भाविक शैलेश याने ८३.१७ टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच किमान कौशल्य विभागाचा राठोड जगदीश इंदल हा विद्यार्थी प्रथम आला असून त्याला ७७.१७ टक्के गुण मिळाले आहेत. नाईक स्वप्निल प्रकाश याने ७३.६७ टक्के गुण मिळवत द्वितीय तर गवळे वनिता दिलीप हीने ७२ टक्के मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संजय गरुड व संचालक, शिक्षकांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...