आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद:अभ्यासासाठी विद्यार्थ्यांवर दडपण नको‎

जळगाव‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालकांनी विद्यार्थ्यांवर‎ अभ्यासासाठी विनाकारण दडपण‎ टाकू नये. त्याऐवजी खेळीमेळीच्या‎ वातावरणात अभ्यास करून घ्यावा.‎ अभ्यासासाठी एकसारखे पाठीमागे‎ लागल्याने मुलांची चिडचिड वाढते,‎ असा सल्ला सक्षम समुपदेशन‎ केंद्राच्या प्रमुख आरती चौधरी यांनी‎ दिला.‎ भुुसावळ येथील भागीरथी‎ प्राथमिक विद्यालयाचे संस्थापक कै.‎ इच्छाराम चौधरी यांच्या‎ जयंतीनिमित्त विद्यालयात आयोजित‎ वार्षिक बक्षीस वितरण समारंभात‎ त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ.‎ चित्तरंजन चौधरी, तर प्रमुख पाहुणे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ म्हणून माजी नगरसेवक निर्मल‎ कोठारी हाेते.

मान्यवरांच्या हस्ते‎ शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना‎ बक्षिसे देण्यात अाली. डॉ.चौधरी‎ यांनी मुलांना दररोज शाळेत पाठवणे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ व अभ्यास करून घेणे ही पालकांची‎ महत्त्वाची जबाबदारी आहे, असे‎ सांगितले. आरती चौधरी यांनी,‎ पालकांनी विद्यार्थ्यांवर‎ अभ्यासासाठी दडपण आणू नये.‎ मुलांच्या कलानुसार अभ्यासाची‎ गोडी लावावी. लहान मुलांना‎ समजावून सांगितले तर ते एेकतात,‎ असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला‎ सोनिच्छा ट्रस्टचे सचिव डॉ. ललित‎ चौधरी, कावेरी चौधरी तसेच‎ महिला क्रीडा मंडळाच्या सदस्या,‎ पालक- शिक्षक संघाचे अध्यक्ष‎ किशोर पवार, शाळेचे मुख्याध्यापक‎ अजय फेगडे, भावना पाटील,‎ सविता वानखेडे, रामकृष्ण इतवारे,‎ योगिता भारंबे, ज्योती झांबरे यांचे‎ सहकार्य लाभले. महिला क्रीडा‎ मंडळाच्या सदस्या जयश्री ओक,‎ श्रद्धा सराफ, स्वाती भोळे, अनिता‎ कवडीवाले, भारती चव्हाण आदी‎ उपस्थित हाेते. सूत्रसंचालन सविता‎ वानखेडे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...