आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी शिबिर:पोटासह‎ नेत्रविकारांनी विद्यार्थी त्रस्त‎ ; शैक्षणिक नुकसान‎ होत असल्याचे दिसले

जळगाव‎7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनपा आणि मेहरूण येथील श्री संत‎ ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक‎ विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने‎ "जागरूक पालक-सुदृढ बालक’‎ अभियानात शिबीर घेण्यात आले.‎ ४५० विद्यार्थ्यांची तपासणी केली‎ असता पाेटाचे व डाेळ्यांचे अाजार‎ जास्त असल्याचे समाेर अाले.‎ सुरुवातीला संस्थेतर्फे अध्यक्ष तथा‎ नगरसेवक प्रशांत नाईक यांनी‎ डॉक्टरांचे स्वागत केले. डॉ. पल्लवी‎ नारखेडे, डॉ. सोनल कुलकर्णी यांनी‎ तपासणी केली. सध्या शहरात‎ साथीच्या आजारामुळे मुलांचे‎ शाळेतील हजेरीचे प्रमाण कमी होते.‎ त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान‎ होते. हे नुकसान टाळण्यासाठी हे‎ मोफत आरोग्य तपासणी शिबीर‎ आयोजित करण्यात आल्याची‎ माहिती अध्यक्ष नाईक यांनी दिली.‎
बातम्या आणखी आहेत...