आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Students Will Be Able To Take Admission In B.Lib And M.Lib Courses In M.Lib Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University From This Year

नवीन अभ्यासक्रम सुरू:कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात यावर्षापासून बी.लिब व एम.लिब अभ्यासक्रमाला घेता येणार प्रवेश

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्र व माहितीशास्त्रज्ञ विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून बी.लिब (BLISc) व एम.लिब (MLISc) हे दोनही एक-एक वर्षीय अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत.

सदर अभ्यासक्रम सुरु करण्यास विद्यापीठ प्राधिकरणाने मान्यता दिलेली असून बी.लिब या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही विद्यापीठाचा व कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे. तर एम.लिब या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही विद्यापीठातून बी.लिब पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले हवे.

नोकरीची संधी सहजच

बी.लिब या वर्गाची प्रवेश क्षमता 30 विद्यार्थी एवढी आहे. तर एम.लिब या अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता 20 विद्यार्थी एवढी आहे. दोनही अभ्यासक्रमांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांप्रमाणे लाभ देय राहतील. दोनही अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठ ग्रंथालय, महाविद्यालयीन ग्रंथालय, सार्वजनिक ग्रंथालय व अन्य शासकीय ग्रंथालये तसेच विविध संस्थांमध्ये नोकरीची संधी सहजच मिळू शकते.

संधीचा लाभ घ्यावा

सदर कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यापीठाचे www.nmu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर अथवा अधिक माहितीसाठी विद्यापीठ ज्ञानस्त्रोत केंद्र, कबचौ उमवि जळगाव येथे प्रत्यक्ष संपर्क करावा व प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन संचालकांकडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...