आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:किल्ल्यांच्या अभ्यासावर‎ विद्यार्थ्यांची कार्यशाळा‎

जळगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘गती'' आणि ए.टी. झांबरे‎ विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने‎ किल्ल्यांचा अभ्यास-‎ व्यक्तिमत्त्वाचा विकास या‎ विषयावर इयत्ता सातवी आणि‎ आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी‎ कार्यशाळा घेण्यात आली. या‎ कार्यशाळेचे वैशिष्ट्य म्हणजे‎ व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांची परीक्षा‎ घेण्यात आली. यातून पहिले तीन‎ क्रमांक आणि तीन उत्तेजनार्थ अशा‎ सहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात‎ आली.

बक्षीस म्हणून दुर्ग‎ संस्कृतीतून कार्य संस्कृती हे पुस्तक‎ देण्यात आले.‎ कार्यशाळेत सहभागी झालेल्या‎ प्रत्येक विद्यार्थ्याला भावदुर्ग हे‎ किल्ल्यांच्या चारोळ्यांचे पुस्तक‎ आणि प्रमाणपत्र देण्यात आले.‎ छत्रपती शिवाजी महाराजांचे‎ किल्ले, त्यामागची भूमिका,‎ व्यक्तिमत्त्व विकासासाठी‎ किल्ल्यांचा उपयोग याविषयी सुंदर‎ विवेचन पीपीटीच्या माध्यमातून‎ सादर केले.

कार्यशाळेत १०१‎ विद्यार्थी सहभागी झाले होते.‎ कार्यक्रमास मुख्याध्यापिका प्रणिता‎ झांबरे, इ. पी. पाचपांडे, व्ही. एस.‎ गडदे, सतीश भोळे, एम. एस.‎ नेमाडे, ‘गती''च्या रश्मी गोखले‎ यांनी सहकार्य केले. शिवनेरी‎ किल्ला हा माणसाच्या‎‎ जडणघडणीत‎ संस्कारांचा वाटा‎ असल्याचे सांगण्यात आले.‎

बातम्या आणखी आहेत...