आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणपती मिरवणुकीत जीवघेणा प्रकार:ज्वालाग्राही ‘स्प्रे’ हवेत मारून तरुणांची स्टंटबाजी; तीन संशयितावर गुन्हा दाखल

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सिंधी कॉलनी परिसरात गणपती स्थापनेच्या मिरणुकीत काही तरुण जीवघेणा स्टंट करताना दिसून आले. मिरवणुकीत तरुणांनी गर्दीत ज्वालाग्राही ‘स्प्रे’ हवेत मारुन आगीचा लोळ तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेत शनिवारी (03 स्पटेंबर) तीन तरुणांच्या विरुद्ध जिल्हापेठ पालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार?

यासंदर्भात अधिक असे की, 31 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास शहरातील सिंधी कॉलनीत चौकात ज्वालाग्राही ‘स्प्रे’ हवेत मारुन आगीचा लोळ निर्माण करण्यात येत होते. वास्तविक बघता ‘हिट स्प्रे’ हा ज्वालाग्रही व स्फोटक पदार्थ हा घरघुती किटक नाशक म्हणुन वापरला जातो. पण या स्प्रे चा वापर गणेशाच्या मिरवणूकीत तसेच ज्वालाग्राही स्प्रे हवेत मारून आगीचा लोळ तयार करत होते. दरम्यान हा प्रकार अंत्यत धाकादायक पद्धतीने सुरू होता. मिरणूकीत हजर असलेल्या तरुणांच्या जिवीतास धोका निर्माण करणारा होता. तसेच, या संदर्भात जिल्हापेठ पोलिसांना माहिती मिळाली होती.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी देखील केली होती. परंतु, तेथे काही मिळुन आले नाही. यानंतर शनिवारी पोलिसांना या स्टंटचे व्हिडीओ फुटेज उपलब्ध झाले. त्यावरुन पोलिसांनी तरुणांची ओळख पटवली. यात समिर विनोदकुमार केसवानी (वय 21, रा. गणपतीनगर), जयदेव श्रवणकुमार केसवानी (वय 21, रा. आदर्शनगर) आणि एका अल्पवयीन मुलगा अशा तिघांनी स्टंटबाजी करुन मिरवणुकीतील लोकांच्या जिवीतास धोका निर्माण केल्याचे दिसून आले.

या तरुणांची ओळख पटल्यानंतर सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वाघळे यांनी दिलेलेल्या फिर्यादीवरुन तीघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना सीआरपीसी कलम 41 (अ) (1) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूकीत असे कोणतेही प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तसेच संबधित तरुणांच्या पालकांना देखील समज देण्यात आले आहेत. या संदर्भात पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी टारगट तरुणांवर लक्ष ठेऊन आहेत. विसर्जन मिरवणुकी शांततेत पार पाडण्यासाठी पुइसंकचे नियोजन सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...