आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी:राशाेमान प्रेक्षकांची पकड घेण्यात यशस्वी

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदाई फाउंडेशन पाचाेरा प्रस्तुत आणि आेम थिअेटर निर्मित ‘राशाेमान’ हे नाटक सादर झाले. कथासूत्र बाैद्ध धर्माशी निगडित असल्यामुळे जापनिज पात्र, भूमिका या नाटकात हाेत्या. नाटकाचे लेखक अनंत भावे यांनी कथाबीज गुंफले आहे. ते ताजाेमारू, समुराई आणि किनेमू या व्यक्तिरेखांभाेवती या कथेद्वारे मानवी संबंध, पती-पत्नीचे संबंध, दाखवण्याचा प्रयत्न करतात. कथासूत्र विविध प्रसंगांनी पुढे जाते.

प्रतीकात्मक पद्धतीने देखील लेखकाला नेमके काय सांगायचे आहे या सभाेवती नाट्य घडत राहते. भन्ते, लाकूडताेड्या, टाेपबनव्या एका घटनेचे वर्णन करतात आणि त्यानुसार रंगमंचावर दृश्य अवतरित हाेताना दिसतात. शहरापासून दूर एका जंगलात खून हाेताे ताे लाकूडताेड्या पाहताे आणि त्यातून नाट्य उलगडत जाते. समुराई आणि किनेमू जंगलातून मार्गक्रमण करताना ताजाेमारू या डाकूशी सामना हाेताे. समुराई आणि ताजाेमारू यांच्यात द्वंद हाेते; परंतु जेव्हा काेर्टात महाराजांसमाेर साक्षी दिल्या जातात त्या खाेट्या आहेत असा निष्कर्ष लाकूडताेड्या, टाेपबनव्या, भन्ते काढतात. सत्य नेमके काय आहे? किनेमू जे कथन करते ते तिच्यावर बलात्कार हाेताे आणि समुराईला ताजाेमारू ठार मारताे. या घटनांमध्ये किनेमूची आई पण अवतरते व गुन्हेगाराला जबर शिक्षा व्हायला हवी असे काेर्टाला सांगते; परंतु या साक्षी खाेट्या ठरल्यानंतर भक्तीणबाईची सुद्धा साक्ष हाेते. ती अशी की समुराईचा आत्मा भक्तीणबाईच्या रूपामध्ये सर्व झालेला प्रसंग कथन करताे. या प्रसंगाचा विशेष उल्लेख हाच की भक्तीणबाईच्या राेलमध्ये रत्नप्रभा साबळे भाव खाऊन जातात.

प्रभावीपणे हा प्रसंग त्यांनी आपल्या कायिक आणि वाचिक अभिनयाने रंगवला. त्यांचेबेअरिंग थाेडेसे सिनेमॅटिक जाणवले; परंतु नाटकास पाेषक असेच ठरले. कथासूत्र थाेडेसे विस्कळीत असेच वाटत हाेते. पहिला अंक कथा विस्तारण्यास संपताे. नाटकाचे प्रमुख शिलेदार लेखक आणि दिग्दर्शक. लेखकाने मांडलेला विषय प्रभावीपणे पाेचवण्याचे काम दिग्दर्शकाचे असते; परंतु, या बराेबरीने दृश्य संपादन करणारा ‘एडिटर’ देखील असावा. विस्तारलेल्या कथासूत्राला बांधण्यात दिग्दर्शकाची कसाेटीच हाेती.

रमेश भाेळे ही कामगिरी पार पाडतात; परंतु रंगमंचावरील एका भागामाध्ये प्रसंग घडत असताना काही पात्र विंगेच्या आड जात हाेती. हे लक्षात घेणे गरजेचे हाेते. नाटकाच्या तांत्रिक बाजूंवर दिग्दर्शकाची पकड हाेती. नेपथ्य किरण कढरे यांचे विषयाला धरूनच हाेते. रंगभूषा, वेशभूषा कथेला पूरक. प्रकाश याेजना प्रसंग खुलवणारी. ताजाेमारूच्या भूमिकेत दीपक भट विशिष्ट वाचिक अभिनयाने प्रभाव पाडतात. स्वप्ना लिंबेकर या भूमिकेच्या विविध छटा दाखवण्यात यशस्वी हाेतात. दीपक भट यांच्या बराेबरीचे प्रसंग खुलवण्यात त्या समरसून आपली कामगिरी चाेख बजावतात. भन्ते, लाकूडताेड्याच्या भूमिकेतील भूषण खैरनार, याेगेश शिंदे समाधानकारक. टाेपबनव्या बनलेले संजय निकुंभ मात्र विशेष प्रभाव पाडतात. मात्र, अभिनयात बाजी मारतात रत्नप्रभा साबळे. समुराई रूपेश बाविस्कर यथातथाच. किनेमूच्या आईच्या भूमिकेत रश्मी कुरंभट्टी समाधानकारक. लेखक अनंत भावे, दिग्दर्शक रमेश भाेळे, तंत्रज्ञ व कलावंतांची कामगिरी ‘राशाेमान’ प्रभावी ठरते.

बातम्या आणखी आहेत...