आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Success Can Be Achieved Through Perseverance, Hard Work, Perseverance, Honoring The Winners In Yuvarang At Bendale College; Respect To The Professors Too |marathi News

दिव्य मराठी विशेष:सातत्य, परिश्रम, चिकाटीने मिळवता येते यश, बेंडाळे महाविद्यालयात युवारंगमधील विजेत्यांचा सन्मान; प्राध्यापकांचाही सन्मान

जळगाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात सातत्य, परिश्रम, जिद्द, चिकाटी असली तर यश खेचून आणता येते, असा सल्ला बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. गाैरी राणे यांनी दिला. शहाद्यात झालेल्या युवारंग युवक महोत्सवात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींच्या काैतुक साेहळ्यात त्या बाेलत होत्या.

युवारंग युवक महोत्सवात बेंडाळे महाविद्यालयातील २३ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यात २६पैकी तब्बल २० कला प्रकारांत त्यांनी सहभाग नाेंदवला. मेहंदी कला प्रकारात शीतल कुंभार या विद्यार्थिनीला सुवर्णपदक मिळाले. क्ले-मॉडलिंग कलाप्रकारात लक्ष्मी बाविस्करने रौप्यपदक मिळवले. या दोन्ही विद्यार्थिनींचा सन्मान प्राचार्या डॉ. गौरी राणे यांनी केला. मराठी विभाग प्रमुख तथा कला मंडळ प्रमुख डॉ. सत्यजित साळवे यांना कार्यक्रम समन्वयक प्रशंसा पुरस्कार नुकताच प्राप्त झाला आहे.

त्यांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थिनींना युवक महोत्सव प्रमाणपत्र देण्यात आले. संघ व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील व डॉ. रूपाली चौधरी यांनाही प्रमाणपत्र देण्यात आले. प्रा. राज गुंगे, प्रा. ऐश्वर्या परदेशी व सुचित्रा लोंढे यांना बुके देऊन उपप्राचार्य डॉ. व्ही. जे. पाटील आणि उपप्राचार्य डॉ. प्रमोद तायडे यांच्या हस्ते सन्मानित केले. निकीता पाटील आणि दिप्ती पाटील यांनी महोत्सवातील अनुभव आणि आठवणी सांगितल्या. डॉ.रूपाली चौधरी यांनी महोत्सवाचे अनुभव कथन केले. लेवा एज्युकेशनल युनियन अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे व संचालकांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...