आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जन्मतः वाकडे पाय असलेल्या मुलांवर उपचार करण्यासाठी पालक येत असतात. त्यातील काही जण हे दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्याच्या आशेने येतात; मात्र बाळाला असणारे अस्थिव्यंग हे दुरुस्त होऊ शकते असा आशावाद डॉक्टर पालकांना देत आहेत. रुग्णालयात आतापर्यंत १० पेक्षा अधिक बालकांना दिव्यांग होण्यापासून वाचवले आहे.
जीएमसीत पाय वाकडे आणि अस्थिव्यंग असणाऱ्या बालकांवर यशस्वी उपचार झाले आहे. आता दिव्यांग बालकाऐवजी सर्व सामान्य बालकांप्रमाणे त्यांना आयुष्य जगता येणार आहे. बालकांवर यशस्वी उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी आणि बालकांच्या नातेवाइकांनी आभार मानले आहे.
अस्थिव्यंगोपचार विभागात नुकतेच जामनेर येथील २ महिन्याचा शुभम, चोपड्याचा ४ महिन्याचा आरिश आणि असोदा येथील २ महिन्याची कल्याणी या तीन बालकांवर यशस्वी उपचार झाले. वैद्यकीय पथकाने सलग दोन महिने बालकांवर योग्य ते उपचार करून पाय पूर्णपणे सरळ करण्यात यश मिळविले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.