आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 विद्यार्थांना सायकली:सुधर्मा संस्थेने स्वीकारले 200 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

जळगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुधर्मा सामाजिक संस्थेतर्फे गरीब दुर्बल वस्तीतील २०० शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलेल आहे. या विद्यार्थांना शाळेत जाण्यासाठी सायकली संस्थेने उपलब्ध करून दिल्या. मनशक्ती परिवारानेही या कामी सहकार्य केले.

संभाजीनगरातील दत्त मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सावखेडा परिसरातील ६ विद्यार्थांना या सायकली देण्यात आल्या. या सर्व सायकली मनशक्तीचे सदस्य अभय खांदे, कोमल जैन, मुकुंद शिंपी, नितिन पाटील, सावरिया ओझा यांनी उपलब्ध करून दिल्या. सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी मार्गदर्शन केले.

बातम्या आणखी आहेत...