आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकत्व स्वीकारले:सुधर्मा संस्थेने 75 आदिवासी विद्यार्थ्यांचे पालकत्व घेतले

जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह परिसरातील कचरा वेचणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुधर्मा संस्था करते. या संस्थेने ७५ आदिवासी विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यांच्या दहावीपर्यंच्या शिक्षणाची जबाबदारी सुधर्मा पार पाडेल.सातपुड्यातील कुंड्यापाणी, बडवानी, बढई, शेनपाणी या आदिवासी पाड्यातील इयत्ता चाैथी ते पाचवीतील हे विद्यार्थी आहेत.

बडाेद्याचे उद्याेजक जगदीशन राजन व सुधर्माचे अध्यक्ष हेमंत बेलसरे, सुनीता बेलसरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. आदिवासी पाड्यातील सुमारे ८४ मुले चाैथी आणि पाचवीत शिकत असून त्यांची काैटुंबिक, आर्थिक कारणाने गळती हाेते. या गळतीपासून त्यांना राेखण्याची सर्वताेपरी जबाबदारी सुधर्माने स्वीकारली. त्यासाठी विद्यार्थ्याना दरवर्षी वही-पेन्सिल, पेन, स्कूल बॅग, नववी, दहावीच्या वर्षाला शुल्क भरण्याची आवश्यकता असल्यास ते भरले जाणार आहे. अभ्यासात काय प्रगती आहे यावरही सुधर्माचे सदस्य लक्ष ठेवून असणार आहेत. शाळेचे शिक्षक चंद्रशेखर साळुंखे यांच्या संपर्कात राहून त्यांच्याकडून दरमहा विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यासाेबत जे विद्यार्थी अभ्यासात एकदमच कच्चे असतील त्यांना खासगी शिकवणी देवून शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी लागणारा खर्च सुधर्मा करेल. या प्रकारचा प्रकल्प यापूर्वी संस्थेने मन्यारखेडा येथील ३५ विद्यार्थ्यांसाठी राबवला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...