आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे सोळा आमदार अपात्रच होतच नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्याचा प्रश्नच नाही. काही लोक हवा पसरवण्याचा प्रयत्न करतात, मायावी विचार मांडतात, निश्चितपणे सांगतो काहीही सत्तासंघर्ष नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जळगावामध्ये पत्रकारांशी बोलताना दिली.
सोळा आमदार अपात्र झाल्यास भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबद्दल प्रश्न विचारला असता, मुनगंटीवार म्हणाले की, सत्ता संघर्ष असता तर आम्ही या कार्यक्रमाला दिसलो असतो का? प्रश्न साधा आहे. हजार वकील उभे राहिले की सूर्य पश्चिमेकडून उगवतो. एक वकील उभा राहिला तर सूर्य पूर्वेकडून उगवतो. कोण जिंकेल? न्यायालयात कोणत्या मॅटरवर केस आहे. असे अपात्र करता येत नाही. हा प्रश्न उपस्थित होत नाही. सत्याचाच विजय होईल. जनतेच्या विकासासाठी काम करतो. आम्ही पुढेही राहू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
मुंगेरीलालचा डीएनए...
सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या निर्णयानंतर सरकार पडेल, असे संजय राऊत म्हणाले असल्याचे पत्रकारांनी त्यांना विचारले तेव्हा मुनगंटीवार म्हणाले की, मुंगेरीलालचे डीएनए असणारे काही नेते आताही आहेत असे वाटते, अशा शब्दात त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली.
शिंदेंचे स्मितहास्य...
एका विवाह समारंभासाठी जळगावात आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी पहिलाच प्रश्न महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा विचारला. त्यावर स्मितहास्य करून हात जोडत तुम्हाला शुभेच्छा असे म्हणत मुख्यमंत्री प्रतिक्रिया न देताच वाहनात बसून निघून गेले.
मंत्र्यांची उपस्थिती...
आमदार लता सोनवणे यांच्या मुलीच्या लग्न समारंभानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आले होते. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री दादा भुसे, आमदार यामिनी जाधव, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील,आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
प्रतिक्रिया न देताच...
विमानतळावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार सोनवणे यांच्या निवासस्थानी वधू-वरांना शुभेच्छा दिल्यानंतर पत्रकारांना टाळून मुख्यमंत्री त्यांच्या वाहनात बसू लागले. पत्रकारांनी त्यांना आवाज देऊन बोलवले. त्यानंतर प्रतिक्रिया न देता मुख्यमंत्री निघून गेले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.