आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबळ परिसर:शहरातील दाेन तरुण, गाढोद्यातील किशोरवयीन मुलाची आत्महत्या

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील समतानगर, रामेश्वर कॉलनीतील दाेन तरुण व गाढोद्यातील किशोरवयीन मुलाने आत्महत्या केली. याप्रकरणी पाेलिस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे.तरुणाने तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत केली आत्महत्या‘दुकानावर जाऊन येतो’ असे आईला सांगून गेलेल्या तरुणाने अवघ्या काही मिनिटात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाबळ परिसरात घडली.

कांतिलाल मोहन पवार (वय २८, रा. समतानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. कांतिलाल पवार हा आई, पत्नी व तीन वर्षाचा मुलासह राहत होता. हातमजुरीचे काम करून तो कुटंुबाचा उदरनिर्वाह करत होता. ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता महाबळ येथून आईसोबत येत असताना तो दुकानावर जाऊन येतो असे आईला सांगून निघून गेला. त्यानंतर महाबळ परिसरातील त्र्यंबकनगरातील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी घेत त्याने आत्महत्या केली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. कांतिलालने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेे नाही. मृत कांतिलालच्या पश्चात आई उषाबाई, पत्नी राणी, मुलगा जयेश आणि तीन बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

गाढोद्यातील किशोरवयीन मुलाने घेतला गळफास : गाढोदा येथे राहणाऱ्या दुर्गेश प्रभाकर पाटील (वय १७) या किशोरवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. या घटनेमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. दुर्गेश हा जळगावात शासकीय आयटीआय येथे शिक्षण घेत होता. मृत दुर्गेशच्या पश्चात आई-वडील, बहीण, आजी व आजोबा असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद केली आहे.

रामेश्वर कॉलनीतील तरुणाने घेतला गळफास रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या कुशल रामा पाटील (वय २८) या तरुणाने ६ डिसेंबर रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागील कारण स्पष्ट झाले नाही. कुशल हा मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत होता. ६ रोजी घरात कोणी नसताना त्याने गळफास घेतला. आई-वडील घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...