आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Suicide Under The Train After Having Breakfast At His Sister's House Bangadi Businessman Committed Suicide After His Wife Left Home With 2 Children

ताई डब्बा पाठवून दे म्हणून गेला अन् आत्महत्या केली:जळगावमधील घटना; 2 मुलांसह पत्नी माहेरी गेल्यानंतर बांगडी व्यावसायिकाची रेल्वेखाली उडी

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुभाष चाैक परिसरातील भवानी माता मंदिराजवळ बांगड्या विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या 45 वर्षीय व्यापाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. व्यापाऱ्याच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

शेख इरफान शेख याकुब मनियार (वय 45)असे मृताचे नाव आहे. त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख इरफान हे पत्नी व दाेन मुलांसह हाजी अहमद नगरात राहत हाेते. तसेच सुभाष चाैकातील भवानी मंदिराजवळ बांगड्यांचा व्यवसाय करीत हाेते. त्यांची पत्नी मुलांसह नंदुरबार येथे माहेरी गेल्या दाेन दिवसांपासून गेलेली आहे. इरफान हे घरी एकटेच हाेते. गुरुवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते दुचाकीने माेठ्या बहिणीकडे गेली हाेते. तिच्याकडे नाष्टा करून जेवणाचा डबा पाठवून दे असा निराेप देऊन बाहेर पडले.

त्यानंतर शिरसाेली रेल्वे स्थानका जवळ येऊन रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी शेख इरफान यांनी रेल्वे रुळाच्या जवळ दुचाकी लावून धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळाल्यावरुन एमआयडीसी पाेलिस ठाण्याची टीम घटनास्थळी पाेहचून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे.

आत्महत्याचे कारण गुलदस्तात

प्रौढाच्या आत्महत्या च्यामागे कौटुंबिक वाद आहेत की व्यवसाय अडचणी याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही त्याचप्रमाणे मृत इरफान शेख याच्या खिशात आत्महत्या करण्यामागील कारण देखील लिहिलेले आढळून आलेले नाही. त्यामुळे आत्महत्या करण्यामागे नेमके काय कारण आहे हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे.

रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी

आत्महत्या च्या घटनेची माहिती मिळाल्या नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शव गृहाच्या परिसरात सालार नगर परिषदेतील नागरिक आणि सुभाष चौक परिसरातील व्यवसायिकांनी तसेच शेख इरफान यांच्या कुटुंबीयांनी नातलकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. शेख इरफान है मितभाषी व मनमिळाऊ असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात होती.

बातम्या आणखी आहेत...