आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • 'Sumoto' Police Action If Controversial Posts Are Made On Social Media; Dr. Information Of Praveen Mundhe In The Press Conference |marathi News

कारवाई:सोशल मीडियातून वादग्रस्त पोस्ट केल्यास पोलिसांची ‘सुमोटो’ कारवाई; डॉ. प्रवीण मुंढे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती

जळगाव19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरुन देशभरात तणाव निर्माण झाला आहे. या संदर्भात कोणत्याही धर्माच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल करणे, स्टेटस ठेवणाऱ्यांवर पोलिस सुमोटो कारवाई करुन गुन्हा दाखल करणार आहेत. या शिवाय पोलिस ठाणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

नुपूर शर्मा यांच्या संदर्भात पोस्ट करणाऱ्यांवर संबधित पोलिस ठाण्यात तीन गुन्हे आत्तापर्यंत दाखल करण्यात आले आहेत. तर यावल पोलिस ठाण्यात बेकायदेशीर जमाव आणल्याप्रकरणी पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन जमावावर एक गुन्हा दाखल केला आहे. विनापरवाना गर्दी करणाऱ्यांवर नजर आहे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रार, फिर्यादीवर पोलिस कारवाई करीत आहे, त्यासाठी कोणत्याही समुदायाने दबाव आणण्यासाठी पोलिस ठाण्यात गर्दी करु नये. फिर्याद देण्यासाठी पाच पेक्षा जास्त लाेकांनी येऊ नये, असे डॉ. मुंढे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...